क्राईम न्युजमावळ

वीटभट्टी मालकाने कामगार महिलेवर केला बलात्कार..

Spread the love

वीटभट्टी मालकाने कामगार महिलेवर केला बलात्कार..A brick kiln owner raped a worker.

 आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी,  ७ ऑक्टोबर.

वीटभट्टी मालकाकडून कामगार महिलेवर बलात्कार केला.सोमवार दि. २ व गुरुवारी दि. ५  कल्हाट ता. मावळात   घडली. पीडित महिलेने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार कलम 376 (2) (N) 504, 506 ॲट्रोसिटी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.विलास सयाजी करवंदे ) वय ४७, रा. कल्हाट ता. मावळ जि. पुणे) बलात्कार प्रकरणी अटक असलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय विवाहित पीडित महिला ही वीटभट्टी मालक आरोपी विलास करवंदे यांच्या वीटभट्टी मध्ये काम करत होती. तिचा नवरा ट्रॅक्टर चालविण्याचे काम करत असून तो वीट घेऊन पनवेलला गेला असता ; पीडित कामगार महिला एकटी असल्याचे पाहून ‘पीडित महिला दलित असल्याचे माहीत असताना देखील, आरोपी विलास करवंदे याने महिलेवर  शिवीगाळ दमदाटी करून जबरदस्तीने बलात्कार केला. कोणाला काही सांगितल्यास नवऱ्याला व पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात भीती चे वातावरण आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!