मावळलोणावळासामाजिक

लोणावळ्यात कोर्ट कमिटीची बैठक संपन्न..

३१ मे २०२४ पर्यंत रेल्वेवरील उड्डाणापूल, तर ३१आॕक्टोबर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन.

Spread the love

लोणावळ्यात कोर्ट कमिटीची बैठक संपन्न ता.३१ मे पर्यत रेल्वेवरील उड्डाणापूल ; तर ३१आॕक्टोबर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,७ ऑक्टोबर.

लोणावळ्यात कोर्ट कमिटीची बैठक संपन्न झाली, यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी ता.३१ मे २०२४ पर्यत रेल्वेवरील उड्डाणापूल काम पूर्ण करण्यात येवून तो सुरू करण्यात येईल. ता.३१मे पर्यत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. रेल्वेच्या हद्दीतील कामे प्रगतिपथावर असून लोनप हद्दीतील रखडलेली कामे ठेकेदाराला सूचना देवून सुरू करण्यात येईल.

यावेळी कोर्ट कमिटीचे अध्यक्ष डाॕ.राधाकृष्णन हे बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कमिटीचे सदस्य दिनेश राणावत , तनू तिवारी, मुख्याधिकारी पंडित पाटील, सर्व खात्यांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व भाजपचे पदाधिकारी,माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष अरूण लाड, भाजपचे गटनेते देविदास कडू, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, हर्षल होगले आदी उपस्थित होते.
आदींनी लोणावळ्यातील विकासकामे यांचा आढावा घेवून विकासकामे तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांना दिला.

भांगरवाडी – नांगरगाव या रेल्वे उड्डाणपूलासाठी भूसंपादनाचा रखडलेला विषय, दोन महिन्यात मार्गी लावत उड्डाणापूल ३१ मे पर्यत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्याधिकारी.पाटील यांनी अश्वासन दिले.लोणावळा शहर साॕल्टर हाऊसचे बांधकाम, दुरूस्ती व तांञिक कामे पूर्ण करू असे आश्वासन कोर्ट कमिटीला दिले.

 

भाजप शहराध्यक्ष अरूण लाड यांनी शहरातील रस्त्याचे बाजूला बेकायदा होर्डींग्ज उभे राहत असल्याचे व माहिती देवूनही नगरपरिषद कारवाई करत नसल्याचे सांगितले .
याबाबत नगरपरिषद मुंबई पुणे महामार्गावर दुतर्फा असलेली अतिक्रमणे व जाहिरातबोर्ड याबाबत ता.१५ ते २५ पर्यत धडक कारवाई करण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.

रस्ते विकास महामंडळ , आयआरबी , लोणावळा नगरपरिषद,  पोलिसप्रशासन यांचेमार्फत ही मोहीम राबविण्यात येईल. याबाबत अतिक्रमण विभाग नियुक्त करून कारवाई मोहीम राबवा,  असे निर्देश कमिटीने दिले.
लोणावळा भाजपने २१मुद्दे कमिटीच्या समोर मांडले होते, त्यातील दोन दोन मुद्दे प्रत्येक मिटींगमधे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वे उड्डाणापूलासाठी जिल्हाधिकारी यांना पञ देवून त्यांची भेटही घेणार आहे,  असे कमिटीचे सदस्यांनी सांगितले.पुढील काळात नागरी समस्यांचे पञ लोनपा. ला दिल्यावर आम्हालाही एक प्रत द्या.आम्ही कारवाई बाबत जाब विचारू, असे कमिटीचेवतीने सांगण्यात आले.

खड्डेमय रस्त्याचे काम ३१आॕक्टोबर पर्यत पूर्ण करा

भांगरवाडी व सिध्दार्थनगरमधे खड्डेमय रस्ते येत्या ता.३१आॕक्टोबरपर्यत बनवून घ्या, अन्यथा ठेकेदाराला जेलमधे टाका, असे स्पष्ट निर्देश उच्चन्यायालयाचे वतीने गठीत कमिटीने लोणावळा नगरपरिषदेला दिले.पावसाळ्यापूर्वी हे काम करताना कोणाचा हलगर्जीपणा झाला.याची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी.निकृष्ट दर्जाचे काम करणा-या ठेकेदाराला कायमचे काळ्या यादीत टाकावे, असे स्पष्ट निर्देश लोणावळा नगरपरिषदेला दिले आहेत.यासोबत यापुढे कामाचे टेंडर देताना त्यामधे सुधारणा करत कामाच्या दर्जाची योग्य मुदत निश्नित करण्याचे धोरण ठरवा, असे समितीने आदेश दिले.समितीकडून नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरण्यात आल्याचे समजताच लोणावळा हद्दीत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!