क्रीडा व मनोरंजनमावळ

समर्थ शिक्षण संकुलामध्ये ५००० विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवी चे वाटप.

Spread the love

समर्थ शिक्षण संकुलामध्ये ५००० विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवी चे वाटप.Distribution of free cloth bags to 5000 students in Samarth Education Complex.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ ऑक्टोबर.

तळेगाव येथील रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ” कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी” या उपक्रमा अंतर्गत नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

प्रसंगी रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष, नु . म . वि. प्र. मंडळाचे सचिव संतोष खांडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे अध्यक्ष रो. राहुल खळदे, सचिव सुनील खोल्लम, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक. दामोदर शिंदे, महेशभाई शहा, शंकर नारखडे प्रकल्प प्रमुख रो. विन्सेंट सालेर, रो. अजय पाटील, रो. अंतोष मालपोटे, रो. कीर्ती हिरे, एनएमआयईटी चे प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना संतोष खांडगे म्हणाले की,“मनुष्याने स्वतःच्या उपयोगासाठी प्लास्टिकचा शोध लावला हाच शोध मानवी सार्वजनिक आरोग्यासाठी घातक बनला आहे. मानवी गरजेचा हव्यास बनवल्याने मागील दोन दशकात प्लास्टिक चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून प्लास्टिक चे उच्चाटन करणे अत्यंत गरजेचे आहे”, विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान करू शकतो या आशयाची शपथ सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. राहुल खळदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. शेखर रहाणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!