क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

लायन्स क्लब तळेगाव आणि ग्रुप ग्रामपंचायत कोंडीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पेयजल शुद्धीकरण प्रकल्प उद्घघाटन सोहळा संपन्न.

Spread the love

लायन्स क्लब तळेगाव आणि ग्रुप ग्रामपंचायत कोंडीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पेयजल शुद्धीकरण प्रकल्प उद्घघाटन सोहळा दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ ऑक्टोबर.

ह्या उद्घघाटन सोहळ्याचे अध्यक्ष होते तरुण तडफदार लायन डॉक्टर अनिकेत काळोखे, लायन डॉक्टर अनिकेत यांनी सर्व मान्यवर उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेची व्यक्ती आणि कार्यपद्धती याची सखोल माहिती आपल्या मनोगतात सादर केली. ज्येष्ठ लायन सदस्य डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी प्रास्ताविकात एक डॉक्टर या नात्याने आपल्या रोजच्या जीवनात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे किती महत्त्व आहे हे स्पष्ट केले.

दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भाविकांना शासकीय यंत्रणेनुसार आपण अनेक वर्ष कॉलरा व्हॅक्सिनेशन देत आलो होतो! पण वारी मार्गावरील उपलब्ध असणाऱ्या पिण्याच्या पाण्यात केवळ टी सी एल या जलशुद्धी करण्याच्या औषधाचा वापर करून संपूर्ण कॉलरामुक्त वारी आपण अनुभवलेली आहे! एवढेच नव्हे तर आमच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातही कॉलरा या साथीच्या आजाराविषयी अतिशय जुजबी माहिती देण्यात आलेली आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले! मावळातील लायन्स क्लब तळेगावने राबविलेल्या सर्व गावातील कावीळ हगवण आणि पोटाच्या सर्व विकारांचे संपूर्ण उच्चाटन झालेले आहे ही सभेला माहिती देऊन या प्रकल्पाच्या उपयुक्ततेची जाणीव गावकऱ्यांना लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या भाषणात दिली.

 

प्रांताचे रिजन चेअरमन ला आनंद खंडेलवाल सरांनी या अत्यंत आवश्यक आरोग्य सेवेबरोबरच कायमस्वरूपी विविध प्रकल्प राबवणाऱ्या तळेगाव लायन्स क्लबचं मनापासून कौतुक करून या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ज्यांनी हे  जलशुद्ध युनिट लायन्स क्लब तळेगावला उपलब्ध करून दिले ते तज्ञ  सचिन लोहारही या समारंभास उपस्थित होते. त्यांनी गावकऱ्यांना पेय जलशुद्धीकरणाची पूर्ण प्रक्रिया आपल्या मनोगतात सादर केली.या प्रकल्पाचे अधिकारी निष्काम कर्मयोगी जेष्ठ लायन नंदकुमार काळोखे यांनी हा प्रकल्प कोंडीवडे गावात आपण का घेतला यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. हे माझ्या मामाचं गाव आहे, या गावातील नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्य संपन्न असावा या तळमळीतूनच हा प्रकल्प आज येथे संपन्न झालेला आहे ही आपली भावना लायन नंदकुमार काळोखेनी अत्यंत तरल शब्दात व्यक्त केली.

सरपंच वैशाली गायकवाड यांनी गावकऱ्यांतर्फे सर्वांच स्वागत केलं पोलीस पाटील भारती गायकवाड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानताना या समारंभास ग्रामस्थांची उपस्थिती फारशी नसल्याची खंत व्यक्त केली. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण आंतरराष्ट्रीय संघटनेचे सर्व लायन सदस्य हे साक्षात परमेश्वराचंच काम करीत आहात या शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आरोग्य दृष्ट्या आवश्यक अशा या प्रकल्पाचे सूत्रसंचालन लायन दीपक बाळसराफ आणि साईनाथ गायकवाड यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. हा प्रकल्प उभारण्यास लायन डॉक्टर सुहास कानिटकर यांनी विशेष अर्थसहाय्य केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यास प्रकल्प अधिकारी नंदकुमार काळोखे माजी सरपंच  तानाजी गायकवाड आणि सचिन लोहार यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला.या प्रकल्प उद्घघाटनासाठी आर सी लायन आनंद खंडेलवाल उद्घघातक म्हणून उपस्थित होते.त्यांच्याबरोबरच लोणावळा लायन क्लबचे प्रेसिडेंट रवि वर्मा व लोणावळा क्लबचे इतर सन्माननीय लायन्स सभासद उपस्थित होते. तळेगाव लायन्स क्लबचे- ट्रेझरर प्रकाश पटेल, सेक्रेटरी लायन सौ सुचित्रा चौधरी, लायन शेखर चौधरी माजी अध्यक्ष मयूर राजगुरव ,लायन महेशभाई शहा , माजी झेडसी लायन प्रमिला वाळुंज, लायन भरत पोतदार ,लायन अनिल तानकर ,लायन दीपक बाळसराफ, लायन अक्षदा राजगुरव, लायन  प्रियंका काळोखे लायन सौ संध्या काळोखे, माजी सरपंच तानाजी गायकवाड व इतर कुंडीवडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!