मावळसामाजिक

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्यालयात साकारली मोहटा देवीची रांगोळी रुपी कलाकृती..

तळेगाव दाभाडे येथील प्रिती नितीन आदक - घुले यांनी आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला साकारली प्रतिकृती.

Spread the love

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्यालयात साकारली मोहटा देवीची रांगोळी रुपी कलाकृती..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ ऑक्टोबर.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील मोहटा देवीची रांगोळी रुपी कलाकृती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी तळेगाव दाभाडे येथील प्रिती नितीन आदक – घुले यांनी आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला साकारली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहोटा देवींची ख्याती आहे. राझाकारच्या काळात मोहटा गावात म्हशी चोरण्याची अख्यायीका आहे. येथे आजही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. आज अतिशय सुंदर पद्धतीने यांनी रेखाटन केले आहे.

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी येथे नोकरीत आहे तसेच गेली 18-19 वर्ष रांगोळी काढत आहे,  नूतन अभियांत्रिकी येथे शास्त्रशद्ध पद्धतीने देवीची स्थापना केली असून नऊ दिवस देवीचा जागर केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!