मावळसामाजिक

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे वाढदिवसानिमित्त ता.२७ ते २९ भव्य भजन स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे वाढदिवसानिमित्त ता.२७ ते २९ भव्य भजन स्पर्धेचे आयोजन.Organized grand bhajan competition from 27th to 29th on the birthday of popular MLA Sunilanna Shelke of Maval.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १८ ऑक्टोबर.

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे वाढदिवसानिमित्त ता.२७ ते २९ दरम्यान भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव येथे ही स्पर्धा श्रीविठ्ठल परिवार , मावळ व श्री मोरया महिला प्रतिष्ठानतर्फे आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी पुरूषगट , महिला गट यांना प्रथम क्रमांकाला प्रत्येकी ३५ हजार रूपये , द्वितीय क्रमांकाला प्रत्येकी ३०हजार रूपये , तृतीय क्रमांकाला प्रत्येकी २५ हजार रूपये तसेच चतुर्थ क्रमांकाला २० ००० रूपये व पाचव्या क्रमांकाला १५ हजाराचे बक्षिस असून बाल भजनी मंडळास प्रथम क्रमांकाला १५०००रूपये द्वितीय क्रमांकाला ९००० /-रूपये , तृतीय क्रमांकाला ७०००/-रूपये, चतुर्थ क्रमांकाला ५हजार रूपये व पाचव्या क्रमांकाला ३हजार आशी बक्षिसे आहेत. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाजवादक व तबलावादक यांना प्रत्येकी २५००/-,रूपये बक्षीस दिले जाईल.

भजन स्पर्धेसाठी एक अभंग, एक गवळण, असा नियम असून दोन्ही गाथेमधीलच असावेत.
ता.११ आॕक्टोबर ला नावनोंदणी व टोकण वाटप ता.१३ रोजी श्रीपोटोबा महाराज मंदिरात, वडगाव येथे ठेवले होते.आयोजक यांचेतर्फे ह.भ.प.दिलीपमहाराज खेंगरे व ह.भ.प.दत्ताभाऊ केदारी यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!