आंदोलननगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा करावा.

अन्यथा, नगरपरिषद,कार्यालयासमोर दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या मार्गाने करणार आंदोलन. अरुण माने मा. नगरसेवक.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा करावा.Administration of Talegaon Dabhade Municipal Council should provide regular water supply. अन्यथा,नगरपरिषद,कार्यालयासमोर दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या मार्गाने करणार आंदोलन. अरुण माने मा. नगरसेवक.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ ऑक्टोबर.

तळेगाव शहराला अनियमितपणे पाणीपुरवठा होत असून गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांच्या मोठ्या तक्रारी येत आहेत. मागील महिन्यामध्ये देखील प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन सुद्धा सांगितले असताना,तळेगाव शहराला पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा, सोमाटणा फाटा या ठिकाणी मेन पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता, त्या कारणांनी आजपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित झालेला नाही.करदाता नागरीकांना नागरी सुविधांपासुन गेली अनेक महीने वंचीत ठेवल्याने करदाता त्रस्त नागरीकांच्या वतीने जेष्ठ स्वातंत्रसैनिक मा. बाळासाहेब जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासुन नगरपालिका कार्यालयासमोर नागरी सुविधा मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे निवेदन फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब नगरपालिका प्रशासन विभाग पुणे यांस, निवेदन दिले आहे.

हे काम पूर्ण होऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसल्याने नागरिकांच्या मनामध्ये प्रशासनाच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झालेली आहे.पंधरा दिवसावर दिवाळी सण  येत असून या सणासुदीच्या वेळी देखील नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाणीपुरवठा पुरेसा वेळेवरती मिळावा. नागरिक पाणीपट्टी बिल नियमित भरत असून त्यांना वेळोवेळी टँकरद्वारे पाणीपुरवठा मागवावा लागत आहे याचा देखील आर्थिक दंड सहन करावा लागत आहे.

गेली दोन वर्ष प्रशासकीय कामकाज सुरू झाल्यापासुन तळेगाव मधील करभरणा-या नागरीकांना अनियमित पाणीपुरवठा खडडे युक्त रस्ते स्वच्छतेचा अभाव आरोग्य समस्या अशा अनेक नागरी समस्यामुळे नागरीक त्रस्त आहोत. या सर्व नागरी सुविधा सुरळीत होईपर्यंत जेष्ठ स्वातंत्रसैनिक बाळासाहेब जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव मधील कर भरणारे नागरीक सोमवार दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासुन नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत

त्रस्त नागरीकांच्या मागण्या

१. अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून दररोज पाणी पुरवठा वेळेत व्हावा.

२. डे्नेजपाईप लाईनसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे रस्ते खडडे युक्त झाले आहेत. संपुर्ण शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे.

३ . नुकताच पावसाळा झाल्यामुळे गवत व झुडपे वाढल्यामुळे गवत व झुडपे वाढल्यामुळे डेंग्यू सारखे मच्छर वाढल्यामुळे रोगराई सुरू झाली आहे. त्यामुळे गवत व झुडपे काढुन फवारणी वेळोवेळी करावी.

४. रस्ते गटारे स्वच्छ असावेत. दररोज झाडलोट व्हावी.

नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा वेळेवर सुरळीत करावा व संपूर्ण वर्षाच्या पाणीपट्टी बिलामध्ये ५० % सवलत मिळावी अशी मागणी मा.नगरसेवक अरुण माने यांनी केली आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत तळेगावातील सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर दिनांक ३० ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.

निवेदनाच्या प्रति,मा. जिल्हाधिकारी पुणे, मा. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड, मा. तहसीलदार वडगाव मावळ, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे. यांना पाठविण्यात आले आहे.अशी माहिती माने यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!