क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रमावळसामाजिक

स्वातंत्र्यसमर ‘या महानाट्याची नोंद’ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये.

Spread the love

स्वातंत्र्यसमर ‘या महानाट्याची नोंद’ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये.The entry of this Mahanatyam in the ‘India Book of Records’.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३१ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्यसमर ‘या महानाट्याची नोंद’ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे, अशी माहितीपत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील, स्वातंत्र्यसमर महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक ॲड. विनय दाभाडे यांनी दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दीपक दाभाडे,खजिनदार निलेश दाभाडे, राजेंद्र दाभाडे, विनोद दाभाडे, सुनील दाभाडे, सतीश दाभाडे,अंकुश दाभाडे,सौरभ चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.संतोष दाभाडे म्हणाले, १डिसेंबर ते ४डिसेंबर २०२२ या कालावधीत थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यसमर महानाट्याचे प्रयोग करण्यात आले. याचा सुमारे ५०हजार इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेतला. या महानाट्यात १५८ क्रांतिकारकांचे योगदान मांडण्यात आले. या महानाट्यात ५०० स्थानिक कलाकारांचा सहभाग होता.

‘ स्वातंत्र्यसमर ‘महानाट्याच्या सादरीकरणाच्या प्रयत्नास लेखन निर्मितीसाठी ॲड .विनय चंद्रकांत दाभाडे यांना तर आयोजनासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे
सेवा प्रतिष्ठानची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून ‘स्वीकार्यता ‘या सदराखाली हा प्रयोग नोंदविला गेला आहे.ॲड .विनय दाभाडे म्हणाले, आपल्या पूर्वजांनी काय केले याचा इतिहास नवीन पिढीला समजला पाहिजे. इतिहास हा आपला प्राचीन ठेवा आहे.त्यातून बोध घेऊन आपल्याला राष्ट्राची प्रगती करता येते.

स्वातंत्र्यसमोर महानाट्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी सत्यशीलराजे दाभाडे आणि श्रुती गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.दरम्यान, ॲड .विनय दाभाडे यांच्या दिग्दर्शनातून आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सहकार्याने ३०३० कलाकारांना घेऊन केलेल्या ‘जाणता राजा ‘या महानाट्याची नोंद २०१६मध्ये
‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ‘मध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

प्रास्ताविक दीपक दाभाडे यांनी केले. निलेश दाभाडे यांनी
आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!