आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आता शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश

मुंबई : आता शालेय अभ्यासक्रमात कृषी या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा,कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, यांच्यासह समग्र शिक्षणचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यास तयार करावा. त्यावर सातत्याने विचार विनिमय करून सर्वकष घटकांचा त्यात समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये