नगरपरिषदमावळसामाजिक

अखेर नगर परिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड.

Spread the love

अखेर नगर परिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड.Finally a sweet Diwali for the city council employees.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १० नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते.त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कायम कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास नगर परिषदेकडून प्रशासक सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत यांचेकडून ठरावास मंजुरी देण्यात आली होती.

तरी प्रशासनाकडून विविध कारणे देत दिरंगाई होत असल्याने नगर परिषद कर्मचारी यांनी अखेर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची भेट घेऊन तोडगा काढणेकरिता विनंती केल्याने त्यांनी आपल्या पद्धतीने वरिष्ठांना संपर्क करून सदर प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली.त्यानंतर अखेर दिवाळीच्या पहिल्या दिवशी सानुग्रह अनुदानाच्या धनादेशावर सही करण्यात आल्याने कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.

याकामी संघटनेचे संवर्ग अधिकारी करनिरीक्षक विजय शहाणे, शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे तसेच आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण आणि अध्यक्ष रवींद्र काळोखे यांचे विशेष सहकार्य मिळाल्याने कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर टकले, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे सचिव रोहित भोसले, संघटक प्रशांत गायकवाड सल्लागार भास्कर वाघमारे आणि पुणे प्रदेश सदस्य प्रविण माने यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!