कृषीवार्तामावळसामाजिक

रोटरी सिटीची काळोखे गोशाळेत पारंपारिक पद्धतीने वसुबारस संपन्न.

Spread the love

रोटरी सिटीची काळोखे गोशाळेत पारंपारिक पद्धतीने वसुबारस संपन्न.Vasubaras are endowed in the traditional manner at the Kalokhe Goshala of Rotary City.

आवाज न्यूज  : मावळ प्रतिनिधी ११ नोव्हेंबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आयोजित दीपोत्सवातील शुभारंभाचा दिवस म्हणजे वसुबारस रो. विलास काळोखे यांच्या गोशाळेत पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी,गोपूजन, भारतीय संस्कृतीमधील गोमाता महत्व या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान, पंचक्रोशीतील नामवंत गोपालकांचा सत्कार सोहळा, पूजा,आर्चा, भजन, महिला मेळावा इत्यादी भरगच्च व भावस्पर्शी कार्यक्रमाने रोटरी सिटीच्या वतीने वसुबारस उत्सव नुकताच संपन्न झाला.

विलास काळोखे आणि परिवार यांची गोशाळा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून अत्याधुनिक व शास्त्रशुध्द पद्धतीने गाईंचे पालन केले जाते गोशाळेत आकर्षक रंगरंगोटी करून गायींना सजवून झुली घालण्यात आल्या होत्या अतिशय भक्तिमय वातावरणात रोटरी सिटीची वसुबारस आनंददायी होती.

भारतीय संस्कृतीमधील गोमातेचे महत्व,गोपालन, गोमुत्रापासून वीजनिर्मिती करता येते गोमूत्र हे विविध प्रकारच्या औषधांसाठी उपयुक्त असून ४० रोगांवर ते उपायकारक आहे असे प्रतिपादन प्रबोधनकार,गोपालक विजयराव शिंदे यांनी केले. अशा प्रकारच्या पारंपारिक सण आणि उत्सवांमधून पवित्र भारतीय संस्कृतीचे रक्षण केले जाते आपण सर्वांनी मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे गायींची काळजी घ्यावी असे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी सांगताना रोटरी सिटीच्या विविध उपक्रमांची माहिती विशद केली.

संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी गाय ही मानवी जीवनात किती उपयोगी आहे हे सांगताना स्वतःचा वैयक्तिक अनुभव विशद करून गोशाळा काढण्याचा उद्देश प्रास्ताविकाद्वारे विशद केला व सर्वांनी गोपालन करावे, पक्षांचे, प्राण्यांचे व मुक्या जनावरांचे काळजीपूर्वक संगोपन करावे असे काळोखे यांनी मनोगताद्वारे सांगितले व रोटरी सिटीच्या माध्यमातून असे उपक्रम वारंवार घेतले जातील अशी ग्वाही दिली.मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध गोपालक विजय शिंदे व प्रसाद तुळपुले(तात्या) यांना सुरेश शेंडे,विलास काळोखे ,दिलीप पारेख, हरिश्चंद्रगड सिंग यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले दिलीप पारेख, हरिश्चंद्र गडसिंग, दीपक फल्ले, संजय मेहता,नितीन शहा यांनी दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष किरण ओसवाल यांनी आभार मानले.
फर्स्ट लेडी सुनिता शेंडे, ॲन्स मनीषा काळोखे,रो.शरयू देवळे,रो.वर्षा‌ खारगे,रो. धनश्री काळे, रो.स्वाती मुठे,रो.रिजवाना शेख, ॲन्स शारदा शिंदे,मंगल गडसिंग, अलबा पारेख,रूपाली टेकवडे, शितल ताये,भारती कश्यप, कविता कलावडे,वेनू कदम इत्यादी महिला भगिनींनी गोमातेची विधीवत पूजा केली व पंचारती करून‌ गाईंना गोडाचा नैवेद्य भरवला अतिशय भावस्पर्शी पूजनाचा कार्यक्रम चालू असताना मधुवंती महिला भजनी मंडळ यांचे सुश्राव्य भजन चालू होते.संजय वाघमारे,रघुनाथ कश्यप,रामनाथ कलावडे,तानाजी मराठे,प्रदीप टेकवडे,नवनाथ म्हसे,प्रशांत ताये, सुरेश दाभाडे, विश्वास कदम, बाळासाहेब चव्हाण, मधुकर गुरव, दशरथ ढमढेरे, गणपत जाधव यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!