ताज्या घडामोडी

औंढेखुर्द आदिवासी पाड्यावर मुलांना रोटरी क्लब आॕफ लोणावळा तर्फे मिठाईचे वाटप.

Spread the love

औंढेखुर्द आदिवासी पाड्यावर मुलांना रोटरी क्लब आॕफ लोणावळा तर्फे मिठाईचे वाटप.Distribution of sweets by Rotary Club of Lonavala to children at Aundekhurd tribal pada.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १५ नोव्हेंबर.

औंढेखुर्द आदिवासी पाड्यावर मुलांना रोटरी क्लब आॕफ लोणावळा तर्फे मिठाईचे रोटरी क्लब आॕफ लोणावळाचे चेअरमन व पदाधिकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
दिवाळी पाडवा व माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांचे जयंतीनिमित्त औंढेखुर्द येथील आदिवासी वस्तीवर सिनेस्टार धर्मेंद्रजी देओल यांचे बंगल्यासमोरच हा कार्यक्रम घेण्यात आला.

रोटरी क्लब आॕफ लोणावळाचे चेअरमन दिलीपशेठ पवार , रोटरीयन सदस्य नितीन कल्याण, नारायण शेरावले , रवि कुलकर्णी, विजया कल्याण, जयवंत नलावडे, मोनिकाताई शेलार,पद्मा चव्हाण, औंढेखुर्द ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच अरूण चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी येथे उपस्थित आसलेल्या पञकार बंधूंनाही रोटरी क्लबतर्फे मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
रोटरी क्लबतर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त आदिवासी वस्तीवर जावून तळागाळातील, दूर्लक्षित असलेल्या गरीब आदिवासी मुलांना फराळ म्हणून मिठाई बाॕक्स देण्यात आले.

यावेळी सुञसंचालन नितीन कल्याण यांनी केले.प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष दिलीपशेठ पवार यांनी केले.
रविंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. तसेच सरपंच चव्हाण यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!