आपला जिल्हापिंपरी चिंचवडसामाजिक

सॉलिसिटर सोसायटीत लागलेल्या आगीवर नियंत्रण

आग नियंत्रणामध्ये मोलाचा वाटा घेणारे  समाजसेवक  विशाल जाधव यांचे नागरिकांनी केले कौतुक.

Spread the love

सॉलिसिटर सोसायटीत लागलेल्या आगीवर नियंत्रण ; आग नियंत्रणामध्ये मोलाचा वाटा घेणारे  समाजसेवक  विशाल जाधव यांचे नागरिकांनी केले कौतुक.

आवाज न्यूज  : पिंपळे सौदागर प्रतिनिधी, १४ नोव्हेंबर.

रहाटणी येथील सॉलीसिटर रेसिडेन्सी मध्ये जमा केलेल्या पालापाचोळ्याच्या ढिगार्‍यामध्यील निचऱ्याला अचानक आग लागली, त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजवलेल्या फटाक्यांचे अर्धवट वाजलेले फटाके हे आणून टाकलेले होते. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा त्या ठिकाणी फटाके वाजवण्यात आले त्या ढिगाऱ्यावर फटाक्यांची ठिणगी पडली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग भडकली बातमी कळतात सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव घटनास्थळी पोहोचले व लगेच त्यांनी रहाटणी येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी व आर्थिक हानी होण्यापासून बचावले त्यामुळे सोसायटीचे चेअरमन व नागरिकांनी विशाल जाधव यांचे आभार मानले.

भविष्यात अशा प्रकारच्या चुका सोसायटीमध्ये होणार नाही अशी हमी सोसायटीतल्या नागरिकांनी दिली व सभासदांनी यापुढे वेळोवेळी असल्या कचऱ्याचा ढिगारा आम्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून देऊ अशी ग्वाही दिली.जर त्या ठिकाणी विशाल जाधव पोहोचले नसते तर अनर्थ घडू शकला असता असा अनर्थ घडू नये यासाठी त्यांनी सोसायटीतील सर्व नागरिकांना व सदस्यांना मार्गदर्शन केले व यावेळी  महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने सुद्धा तत्परता दाखवून वेळेवर हजर झाले व आगीवर नियंत्रण आणून सदर कचऱ्याचा ढिगारा पाण्याने भिजवून आग आटोक्यात आणली.

जाधव यांनी कचऱ्याच्या ढिगार्‍या बाजूला असणाऱ्या चार चाकी वाहने व टू व्हीलर यांना बाजूला सारून होणारे आर्थिक नुकसान यापासून बचाव केला. जर सदर जागेवर अगडबंब झाला असता तर आजूबाजूच्या पार्किंग मधील अनेक वाहने जळून खाक झाली असती. त्यामुळे सर्व सोसायटी धारकांनी कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन लावावे भविष्यात अशी घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान श्रीकांत वैरागर,  सिनियर फायरमन, शिवलाल झनकार,सिनियर फायरमन, मयूर कुंभार, वाहनचालक परमेश्वर दराडे, ट्रेनी फायरमन प्रथमेश सागवेकर, ट्रेनी फायरमन सुयश सावंत , ट्रेनी फायरमन राजू काळे  यांनी शर्थीचे प्रयत्न केले.सर्व जवानांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!