क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

“सूर संगती, दीप उजळती” : कलापिनी दिवाळी पहाटच्या सुरांमध्ये रसिक मोहरले …..

यंदाचे २७ वे वर्ष.

Spread the love

“सूर संगती, दीप उजळती” :
कलापिनी दिवाळी पहाटच्या सुरांमध्ये रसिक मोहरले …..यंदाचे २७ वे वर्ष The tunes are playing, the lights are shining”:Kalapini Diwali is engrossed in the dawn tunes…..27th year of this year

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे दि. ११, क्षण आनंदी कवेत घेऊन, प्रभात समयी त्वरे निघाली, दुःख यातना विसरून साऱ्या, सप्तसुरांची मधुर आवली.
कलापिनीच्या रसिकांसाठी, दीपावलीची नविन निर्मिती
सूरसंगती दीप उजळती ||
या काव्यपंक्तींचा प्रत्यय देणारी शब्द, सूर, तालाने सजलेली दिवाळी पहाट कलापिनी सांस्कृतिक केंद्रात रसिकांनी अनुभवली.

सुरांच्या संगतीने कलेचा आनंद घेत दिवाळी साजरी करण्यासाठी, कलापिनी आणि हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “सूर संगती, दीप उजळती” या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी पहाटचे हे २७ वे वर्ष होते. कलापिनीच्या गुणवंत कलाकारांनी एकापेक्षा एक सुरेल गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. जोडी या संकल्पनेचा आनंद या कार्यक्रमात कलाकारांनी दिला. सूर – ताल, माणूस – निसर्ग, गायन – वादन, नृत्य – गायन, संगीतकार – गीतकार अशा अनेक जोड्या रसिकांच्या भेटीला आल्या होत्या. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उतरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.

हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक ॲड रविंद्र दाभाडे, अध्यक्ष सुधाकर देशमुख, कैलास भेगडे, पंढरीनाथ दाभाडे, देवराम वाघोले, प्रदीप गटे, श्याम इंदोरे, दत्तात्रय कांदळकर, हिंमत पुरोहित, नामदेव आंद्रे व अन्य पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कष्ट घेऊन गुणवत्तापूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांचे ॲड रविंद्र दाभाडे यांनी विशेष कौतुक केले.दिनेश कुलकर्णी लिखित आणि संपदा थिटे यांनी संगीतबद्ध केलेल्या शीर्षक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बसंत बहारच्या मालेत, बसंत बहार मधली कै. पं. कमलाकर जोशी यांची ‘स्वरकमलांजली’ या ध्वनीफितीतील सरगम. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांची कविता – मै मधुसे अनभिज्ञ आज भी.. ही कार्यकर्त्याची मनस्थिती कशी असावी हे सांगणारी कविता सादर करण्यात आली.

नितेश कुलकर्णी यांनी ‘जग में सुंदर है दो नाम’ हे भजन सादर केले. तिल्लाना ही भरत नाट्यम मधली एक पारंपरिक रचना वेगळ्या आणि अभिनव स्वरुपात सादर करण्यात आली. नृत्य रचना – डॉ मीनल कुलकर्णी यांची होती. शरयू पवनीकर, शामली देशमुख, सिद्धी शहा, समा भावसार यांनी नृत्य सादर केले. मृदुंग वादन – श्री दिनकर यांनी केले. हिंदी आणि मराठी या भाषाभगिनी ‘ना मानोगो तो’ या गीतातून भेटल्या. योजना पळसुले -देसाई यांच्या या गीताने रसिकांची वाहवा मिळवली. संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी या गीतकार आणि संगीतकाराच्या जोडीची बालगीते कलापिनी कुमारभवनच्या ऋग्वेद , विवान, अन्वय, वैदेही, स्वरा, ओवी, वैष्णवी, शांभवी, ऋतू, श्रद्धा, स्पृहा, मुग्धा, रेवा, गार्गी, सिरिशा, राजलक्ष्मी या बालकलाकारांनी सादर केली.

पं. विदुर महाजन यांचे शिष्य कामिनी जोशी, विराज सवाई, मनीषा शेटे, अमेय करंदीकर यांच्या सतार वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांना तबलासाथ विनायक कुडाळकर यांनी केली होती. देव आणि भक्ताचं आगळ वेगळ नातं सांगणारा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ‘नरोहरी हरी नारायण’ नृत्यरुपात सादर करण्यात आला. नृत्यात अदिती अरगडे, जान्हवी सरोदे, अंकिता कुचेकर, स्फूर्ती शेट्टी, चित्रांगी राजे, आकांक्षा गंभीर, रिशिका सांडभोर, सुप्रिया नायर सहभागी झाल्या होत्या. गदिमा आणि बाबूजी या जोडीची गीते सादर करण्यात आली. स्वयंवर झाले सीतेचे या गीताची नृत्य रचना शरयू पवनीकर हिने केली होती.

समा भावसार, जान्हवी सरोदे, मैत्रेयी कोल्हापुरे, ऋजुता जोशी, गिरिजा सुतार, अवनी भोते या नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केले. ना. धो. महानोर आणि निसर्ग तसेच अजय – अतुल या संगीतकारांची जोडी उलगडून दाखवताना लीना परगी, रश्मी कुलकर्णी, संपदा थिटे, विनायक लिमये, सम्राट काशीकर यांनी एकाहून एक सुरेल गीते गायली.
संचय कथक नृत्य अकादमीच्या राजश्री धोंगडे, श्रावणी पुल्लीवार, वैदेही काशीकर, गिरीजा कुलकर्णी, ऋजुता गोखले यांनी नृत्य रुपात मल्हार तराणा सादर केला. संत तुकाराम महाराजांच्या ‘धरुनी दोन्ही रूपे, पाळणे संहार’ या अभंगाने आणि ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपदा थिटे यांनी संगीत संयोजन केले होते. राजेश झिरपे (सिंथेसायझर), मंगेश राजहंस (तबला), पावन झोडगे (पखवाज), प्रवीण ढवळे, योगीराज राजहंस (तालवाद्य), दर्शन कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. डॉ. विनया केसकर आणि विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले.
योगिता पन्हाळे, नीता धोपाटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सुप्रिया खानोलकर, दीपाली जोशी, राखी भालेराव , मधुवंती रानडे आणि कलापिनी महिला मंचाच्या सदस्यांनी रंगमंच सजावट केली होती.
मीनल कुलकर्णी आणि संपदा थिटे प्रकल्पप्रमुख म्हणून कम केले. हेमंत झेंडे आणि विनायक भालेराव यांनी संयोजन केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले. प्रतिक मेहता, अभिलाष भवार, स्वच्छंद गंदगे, सायली रौंधळ, सिद्धी शहा, रश्मी पांढरे, अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, रुपाली पाटणकर, केतकी लिमये, भाग्यश्री हरहरे, ऋचा पोंक्षे, माधवी एरंडे, छाया हिंगमिरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!