औद्योगिकपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसामाजिक

ॲप्रेंटिसशीप मुळे लाखो रोजगाराच्या संधी ..

सीताराम कांडी पीसीसीओईआर मध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट संपन्न.

Spread the love

ॲप्रेंटिसशीप मुळे लाखो रोजगाराच्या संधी – सीताराम कांडी पीसीसीओईआर मध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट संपन्न.Millions of employment opportunities due to apprenticeship – Sitaram KandiI ndustry Institute Interaction Meet held at PCCOER.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी, २० नोव्हेंबर.

नॅशनल ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीमच्या माध्यमातून केंद्र सरकार तर्फे युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत असे प्रतिपादन टाटा मोटर्सच्या मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष व बोर्ड ऑफ ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे चेअरमन सीताराम कांडी यांनी व्यक्त केले. तसेच ॲप्रेंटिसशीप यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कंपन्यांनी पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचे आवाहन देखील कांडी यांनी केले.

बोर्ड ऑफ ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग (पश्चिम विभाग) मुंबई, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स(माटीपीओ) व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट व नॅशनल ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीमची यशस्वी अंमलबजावणी” या कार्यशाळेचे आयोजन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे
करण्यात आले होते. औद्योगिक आस्थापना व शैक्षणिक संस्था यांच्यामधील दुवा साधण्याकरिता व शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या बोर्ड ऑफ ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंगच्या अंतर्गत ॲप्रेंटिसशीपचे नवीन नियम समजून घेण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नॅशनल ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीमच्या 2.0 या नवीन पोर्टलचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमधून १०० ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स तसेच सुमारे ३०० कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी
सांगितले की, चार वर्ष विद्यार्थी हा शिक्षण घेत असतो परंतु तेथून पुढची साधारणतः ४० वर्ष तो औद्योगिक क्षेत्रात कार्यरत राहणार असतो म्हणून औद्योगिक क्षेत्राने या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शैक्षणिक संस्थांना हातभार लावावा असे आवाहन केले.
नॅशनल ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीम द्वारा विद्यार्थ्यांना ऑन-द-जॉब ट्रेनिंग व स्टायपेंड मिळतो आणि पुढे कुशल मनुष्यबळ तयार होते म्हणून या स्कीम बाबतीत विद्यार्थ्यांना वेळोवळी माहिती द्यावी असे आवाहन बोर्ड ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग मुंबईचे संचालक पी. एन. जुमले यांनी केले.

प्राध्यापक हे देखील औद्योगिक क्षेत्राचा रिसर्च समोर नेऊ शकतात म्हणून औद्योगिक क्षेत्राने देखील शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापकांना रिसर्च प्रक्रियेमध्ये संधी द्यावी असे आवाहन पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले.
बोर्ड ऑफ ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग मुंबईचे उपसंचालक एन. एन. वडोदे यांनीही मार्गदर्शन केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दलअभिनंदन केले.
प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. दिपक पवार, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. हिना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!