आपला जिल्हामावळराजकीय

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांवर कारवाई करा. मावळ काँग्रेस कमिटी

रामदास आप्पा काकडे माता- पिता सन्मान मोहीम.

Spread the love

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांवर कारवाई करा .. मावळ काँग्रेस कमिटी ; रामदास आप्पा काकडे माता- पिता सन्मान मोहीम.Take action against children who do not take care of their elderly parents .. Maval Congress Committee ; Ramdas Appa Kakade Parents Honor Campaign.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ नोव्हेंबर.

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याची मागणी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

वृद्ध आई-वडिलांबाबत अजूनही समाजात आदर युक्त भावना नसून आजही वृद्ध आई वडिलांना लग्न झालेल्या मुलांकडून यातना सहन कराव्या लागत आहेत. अशा सर्व ज्येष्ठ आई-वडिलांसाठी काँग्रेस कमिटीतर्फे पालक सन्मान मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास आप्पा काकडे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सर्व ज्येष्ठ आई-वडिलांसाठी पालक सन्मान मोहिमेंतर्गत संपर्क साधला जाणार आहे ज्या ज्येष्ठ पालकांना आपल्या मुला-मुलींकडून त्रास होत आहे त्यांनी काँग्रेस कमिटीच्या टोल फ्री क्रमांक 83081 30132 वर संपर्क साधून मदत मागणे अनिवार्य आहे.तसेच ज्येष्ठ पालकांसाठी काँग्रेस कमिटी तर्फे वैद्यकीय सुविधा सुद्धा देण्यात येणार असल्याचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी नमूद केले आहे.

समाजामध्ये नीती मूल्यांची घसरण होत चालल्यामुळे आज आपल्या जन्मदात्या पालकांना देखील मुले सांभाळत नसून अशा मुलांना कायदेशीर धाक देणे गरजेचे असल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पोलीस दलाला वृद्ध आई-वडिलांच्या संरक्षणाबाबत तसेच ज्येष्ठांच्या सन्मानाबाबत काळजी घेण्याचे आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर जिल्ह्याचे नेते रामदास आप्पा काकडे मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष योगेश पारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!