आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

कौठळी शाळेत संविधान दिन साजरा..

जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

Spread the love

कौठळी शाळेत संविधान दिन साजरा.Constitution day celebration in Kothali school..जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २६ नोव्हेंबर.

आज दिनांक २६ नोव्हेंबर जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.वाचना नंतर २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिक व शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर निमित्त संविधानाचा परिचय होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जाणीव जागृती होणे तसेच संविधानातील मुलतत्त्वांचा प्रचार व प्रसार होणे या उद्देशाने माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत पोस्टर निर्मिती आयोजित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!