कृषीवार्तालोणावळासामाजिक

लोणावळा शहर व परिसरात अवकाळी पाऊस..

भाताच्या पिकांचे नुकसान, तर रब्बी पिकांसाठी फायदेशीर.

Spread the love

लोणावळा शहर व परिसरात अवकाळी पाऊस ; भाताच्या पिकांचे नुकसान, तर रब्बी पिकांसाठी फायदेशीर.Unseasonal rain in Lonavala city and area; Damage to paddy crops, while beneficial to rabi crops.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,२६ नोव्हेंबर.

लोणावळा शहर व परिसरात अवकाळी पाऊस सुमारे साडेपाच ते राञी सव्वानऊपर्यत अधूनमधून पडत होता.
आवकाळी पावसामुळे शेतामधे काही शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भाताचे पीकाचे नुकसान झाले.
तसेच पेंढ्या भिजून जनावरांच्या चारा पाणी आदींचे नुकसान करणारा पाऊस आहे, रब्बी पिकांसाठी फायदेशीर असणारा पाऊस असून यामुळे हिवाळा ऋतूमधेही पाऊस पडत असल्याने पावसाळा लांबला असेच म्हणावे लागेल, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

लोणावळा शहरात प्रथम पाऊस पडला, तर लोणावळा जवळच कुसगाव, डोंगरगाववाडी, औंढेखुर्द, औंढोली या गावात सकाळपासून अंधारी आली होती.
सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने होणाऱ्या भातशेतीचे नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागमी काही भाजे, देवले, औंढेखुर्द, औंढोली, पाटण, बोरजचे ग्रामस्थ व शेतक-यांचे वतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!