क्राईम न्युजलोणावळा

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड.

Spread the love

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड.Lonavala rural burglary revealed within 2 hours.

आवाज न्यूज  : प्रतिनिधी श्रावणी कामत, २६ नोव्हेंबर.

पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने मा. पोलीस अधीक्षक
पुणे ग्रामीण  अंकीत गोयल  यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत
दिलेने त्या अनुषंगाने मा. सहा पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा  सत्यसाई
कार्तीक सो यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयात डीबी पथकाची मिटींग घेवुन
घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक १७/११/२०२३ रोजी रात्री १०:०० वा.ते दिनांक १८/११/२०२३ रोजी
सकाळी ०७:३० वा चे दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हददीमध्ये
मौजे भाजे ता मावळ जि पुणे येथील ओमसाई नावाचे गॅरेज मधुन मोटार सायकलचे ब्लॉक
पिस्टन, लायनर, चैन किट, फोर व्हिलरचे क्लच प्लेट, ब्रेक डिक्स असा एकुण १६,०५०/-
रूपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत दि. २३/११/२०२३ रोजी
लोणावळा ग्रामीण पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक. किशोर धुमाळ
यांचे मार्गदर्शनाखाली पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे,
खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया या पथकाने मौजे भाजे, मळवली, कार्ला या
भागात गस्त घालुन तसेच बातमीदारामार्फत माहिती घेवुन संशयीत इसम नामे संदीप भानुदास
जाधव, वय ४१, रा. लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ लोणावळा ता मावळ जि पुणे मुळ रा.
टाकळकरवाडी ता खेड जि पुणे यास ताब्यात घेतले.

त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास गुन्हयाचेकामी अटक करण्यात आले आहे. त्याची मा. हुजुर कोर्टाने ०३ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली असुन कस्टडी दरम्यान गुन्हयामध्ये गेलेला१६,०५०/- रू. किं.चा मुददेमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोहवा नितीन कदम हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण  अंकीत गोयल सोा, मा. अपरपोलीस अधीक्षक सो  मितेश घटटे पुणे विभाग व मा. सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्डअमित भदोरिया यांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!