अध्यात्मिकआपला जिल्हामावळ

त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ५००० दिव्यांचा भव्य “दीपोत्सव” साजरा.

दीपोत्सवाच्या यंदाच्या ८ व्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद..

Spread the love

त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ५००० दिव्यांचा भव्य “दीपोत्सव” साजरा.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर  तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर.

त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ५००० दिव्यांचा भव्य “दीपोत्सव” साजरा.त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वा श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह संपूर्ण रामायणावर आधारित श्रीराम जन्म, सीता- श्रीराम विवाह, श्रीराम वनवास, सीतामातेचे हरण,श्री हनुमान संजीवनी, रामसेतू , रावण दहन, व अयोध्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती रांगोळी काढून ५००० दिव्यांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती.

जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात अखंड हिंदुस्थानचे आराध्य व जिव्हाळ्याचा विषय असलेले श्रीराम मंदिराची भव्य रांगोळी काढण्यात आली व भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल ५ हजार आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमासुद्धा म्हणतात. कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे तारकासूर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती ताराक्ष, कमलाष्ट आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले, तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा, शंकराची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुन दिले.

मान्यवरांचे स्वागत संस्थेचे आधारस्तंभ PMRDA सदस्य नगरसेवक संतोष भेगडे यांनी स्वागत केले. दीपोत्सवाचे उदघाटन श्री डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक सहकार भूषण बबनराव भेगडे, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार,श्रीमंत सरदार वृषाली राजे दाभाडेसरकार,माजी नगराध्यक्ष अॕड. रविंद्रनाथ दाभाडे,नगरसेवक शोभाताई भेगडे, संध्याताई भेगडे, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे,नंदकुमार कोतुळकर , संजय बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्वांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
श्री डोळसनाथ पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून यावेळी उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे,डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे, यांच्या समवेत भेगडे संस्थेचे उपाध्यक्ष विकास कंद, सचिव अतुल राऊत,  खजिनदार निलेश राक्षे, संचालक शंकर भेगडे, आदी मान्यवर व तरुण ऐक्य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते, श्री डोळसनाथ पथसंस्थेचे व सर्व महिला बचत गट, श्री डोळसनाथ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व तळेगावासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.

कल्पना भोपळे, अरुण माने, श्रीराम कुबेर, कलापिनीचे संस्थापक डॉ. अनंत परांजपे, डॉ.शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा,प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक शैलेशभाई शहा, दिपकभाई शहा, अशोक दाभाडे, संतोष मुऱ्हे, रूपालीताई दाभाडे, शैलजा काळोखे ,रजनीताई ठाकूर , राजश्री म्हस्के,संध्या थोरात सविता मंचरे ,संतोषभाऊ भेगडे, शरद आण्णा भोंगाडे, अतुल राऊत, शंकर छ.भेगडे, कौस्तुभ भेगडे, आशिष खांडगे, राकेश खळदे, विजय भेगडे, समीर भेगडे, अमित भसे, अंकुशभाऊ आंबेकर कृ.उ. बाजार समितीचे संचालक बाळासाहेब वाजे, पिराजी भेगडे, संजय ओसवाल, तनुजा दाभाडे, संजय दाभाडे, सारिकाताई शेळके, पंढरीनाथ मखामले, विकास भेगडे, पतसंस्था व्यवस्थापिका तस्लिम शिकीलकर.

यावेळी नगरसेवक व मुख्य आयोजक संतोषभाऊ भेगडे यांनी दीपोत्सव चे महत्व सांगितले, तसेच श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे सरकार, रविंद्रनाथ दाभाडे, डॉ अनंत परांजपे, सहकार भूषण बबनराव भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.मागील ७ वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या ८ व्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्या बद्दल उपक्रमाचे आयोजक पीएमआरडीए चे सदस्य.नगरसेवक संतोष भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!