Puneताज्या घडामोडी

अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई.

नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवल्याने महापालिकेने उगारला कारवाईचा बडगा.

Spread the love

अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई ;नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवल्याने महापालिकेने उगारला कारवाईचा बडगा.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ३० नोव्हेंबर.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण  मार्गावर  अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये अनेक दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या बाबत इचईएमआरएलकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे महामार्गाच्या बाजूने अनधिकृतपणे अनेक फर्निचरची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे हे दुकानदार महापालिकेचा कर बुडवत होते.महामार्गालगत ही आलिशान दुकाने असल्याने अनेकदा या ठिकाणी वाहतूकीच्या अडचणी येत असत. ही अनधिकृत दुकाने काढून घेण्यासाठी पुणे महापालिकेने त्या दुकानदारांना मागील काही दिवसांपूर्वी नोटीसा दिल्या होत्या. मात्र त्या नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवली होती.नोटीसा देऊन देखील हे दुकानदार प्रशासनाला जुमानत नसल्याने, प्रशासनाने  कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी सकाळी पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक,पोलीस बंदोबस्तात जेडब्ल्यूए कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, बिगारी व पोलीस कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचारी  उपस्थित होते.

ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!