मावळसामाजिक

संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाची तळेगाव दाभाडे येथे शाखा उदघाटन संपन्न.

Spread the love

संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाची तळेगाव दाभाडे येथे शाखा उदघाटन संपन्न.On the occasion of the Constitution Day, the branch of the National Tanners’ Federation was inaugurated at Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ डिसेंबर.

पुणे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष मा बबनराव घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली .
दि. ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची तळेगाव दाभाडे शाखेच्या नामफलकाचे उदघाटन संपन्न झाले,
त्या प्रसंगी तळेगाव नगरपरिषदेचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव मा ज्ञानेश्वरजी कांबळे, मा. नगरसेवक अरुण माने अंकुश आंबेकर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन झाले.

त्या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संत तुकाराम साखर कारखान्याचे मा संचालक मा अंकुशजी आंबेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे माज़ी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगरसेवक मा अरुण माने संघटक सचिव प्रा, दत्तात्रेय शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा प्रल्हाद कांबळे संत गुरु रोहिदास विचार समिती अध्यक्ष संतोष वाघमारे, लक्ष्मण मुदळे, शिंदे सरकार विष्णु सातपुते उपस्थित होते.

चर्मकार समाज संघटीत करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा बबनराव घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाची स्थापना झाली. कामगार व समाज बांधवांना न्याय मिळवून देणारी देशातील एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय चर्मकार महासंघ समाज संघटीत करून न्याय मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हात मोर्चा व आंदोलन करुन समाजाला न्याय मिळवून दिला.

असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव संत चर्मोद्योग विकास महामंडळाचे मा अध्यक्ष, राज्य मंत्री दर्जा मा ज्ञानेश्वरजी कांबळे यांनी सांगितले.प्राध्यापक मा दत्ताराम शिंदे यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. संविधानामुळे आपणास आधिकार मिळाले.
न्याय हक्क शिक्षण नोकरी मिळाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीही फिटणार नाहीत.
संविधान रक्षण व जन जागृती करण्यासाठी पुढे यावे संविधान आपले जीवन आहे.संविधान आपले कवच कुंडल आहेत. संविधान जिवंत राहिले तर आपण जिवंत आहेत.
हे विसरून चालणार नाही असे सुदाम कांबळे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा नगरसेवक अरुण माने यांनी विशेष परिसरअम घेतले.नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र राष्ट्रीय महासचिव मा ज्ञानेश्वरजी कांबळे यांचे हस्ते देण्यात आले.अध्यक्ष पदी रमेश देव माने
उपाध्यक्ष पदी भिमराव बोरसे,उपाध्यक्ष दत्तात्रेय शिरके
सचिव पदी भगवान वाघमारे यांना नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!