पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

शरद पवार गटाचा शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा.

Spread the love

 शरद पवार गटाचा शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा.Sharad Pawar group to meet in Pimpri-Chinchwad on Saturday.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १ डिसेंबर.

अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गटाचा मेळावा शनिवारी २ डिसेंबरला पिंपरी मधील मैदानात पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे देखील उदघाटन केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाचे जनसंपर्क कार्यालय पिंपरी चौकातील शनी मंदिराशेजारी उभारण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असून पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे वाटप आणि कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले. शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनीही त्यांना साथ दिली. तसेच पार्थ पवार हे सुद्धा जबाबदारीने कामाला लागले आहेत. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष घातले असून आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणा-या सेवा रस्त्यावर खराळवाडीत अजित पवार गटाचे तर महामार्गावरुन निगडीकडे जाणा-या रस्त्यावर पिंपरीत शरद पवार यांच्या गटाचे कार्यालय आहे. दोन्ही पक्षांची कार्यालये समोरा-समोर असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!