कृषीवार्तामावळसामाजिक

जाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान..

Spread the love

जाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान..The twin snakes caught in the net were given life by wildlife protector Maval.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १ डिसेंबर.

जाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस जातीच्या सापांची वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांकडून सुखरूप सुटका करण्यात आली.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी दिलेल्या माहिती नुसार साते गाव येथे एका जाळ्यात घोणस जातीच्या सापांचे जुळे अडकले असल्याची माहिती उमेश गावडे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी यांना दिली.
तसेच तुषार सातकर, केतीका कासेटवार, झाकीर शेख, जिगर सोलंकी यांनी जाऊन सुरक्षित त्या दोन्ही घोणस रेसक्यू करून त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना जंगलात सोडून दिले.

सोसायटी मधिल अविनाश शिंदे, विनायक निकम, दिनेश यादव यांनी सापांना न मारता त्यांना वाचवलं पाहिजे म्हणून लगेच संपर्क केला. केतीका कासेटवार आणि तुषार सातकर यांनी लोकांमध्ये जनजागृति केली, घोणस हा विषारी जातीचा साप आहे आणि कोणीही अजगर समजून त्याला पकडू नये आणि सर्प मारू नये असे आवाहन केले.कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळ पासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागाला संपर्क (1926)या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!