आरोग्य व शिक्षण

पीएमपीएमएल बससेवा लोणावळ्यापर्यंत धावणार ?

Spread the love

लोणावळा : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची अर्थात पीएमपीएमएलची बस सेवा लोणावळ्यापर्यंत आणण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

सध्या पीएमपीची सेवा कामशेत पर्यंत सुरू आहे. या सेवेचा विस्तार करून पर्यटन स्थळ असणारे लोणावळ्यापर्यंत सेवा देण्यासाठी पीएमपीची चाचपणी सुरू आहे.

लोणावळा-खंडाळा भागातून पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.कामधंद्यानिमित्त तसेच नोकरी व कॉलेज निमित्ताने अनेक जण पुण्यापर्यंत प्रवास करतात. परंतु रेल्वे सेवा वगळता पुणे प्रवासासाठी कुठलेही साधन नागरिकांकडे नाही. त्यामुळे लोणावळ्यापर्यंत पीएमपी बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना तसेच चाकरमान्यांना दिलासा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!