Puneमहाराष्ट्रलोणावळासामाजिक

संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणेंचा लोकसभेत दुपारच्या लोणावळा पुणे लोणावळा लोकलसेवा सुरू करण्यासाठी प्रश्न.

शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, दुधवाले यांची होतेय गैरसोय.

Spread the love

संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणेंचा लोकसभेत दुपारच्या लोणावळा पुणे लोणावळा लोकलसेवा सुरू करण्यासाठी प्रश्न ; शाळेतील विद्यार्थी शेतकरी , दुधवाले यांची बाजू मांडली.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ४ डिसेंबर.

संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणेंचा लोकसभेत दुपारच्या लोणावळा पुणे लोणावळा लोकलसेवा सुरू करण्यासाठी प्रश्न मांडला. कोरोना काळात बंद झालेल्या लोकलसेवा पूर्ववत झाल्या, पण सकाळी साडेअकरा ची लोकल ते दुपारी तीनची लोकल ट्रेन या काळातील फे-या बंद झाल्याने पुणे, लोणावळा दरम्यान रेल्वेप्रवाशांचे हाल होत आहेत. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शेतकरी दुग्धव्यवसायिक यांना दोन आडीच तास रखडून राहावे लागते, वेळेचा अपव्यय  होतो.

याबाबत माजी रेल्वेमंञी सुरेशजी प्रभु असताना निवेदने दिलेली आहेत.दुपारची लोकलसेवा मेंटेनन्स कामासाठी बंद ठेवली जाते, मग या काळात मालगाडी कशी चालते, असा प्रश्न बारणे यांनी उपस्थित केला.

दुपारी साडेअकरा नंतरच्या लोकलसेवा सुरू केल्यास महाराष्ट्रातून मंख्यमंञी. एकनाथराव शिंदे हे यासाठी हवे ते सहकार्य करायला तयार आहेत, असे पुढे बारणे म्हणाले.
वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वेमंञालयातून कोणतीच कार्यवाही होत नाही, याबाबतही खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!