क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

प्रभात कल्चरल फाउंडेशनचा वार्षिक संगीत महोत्सव थाटात साजरा..

प्रभात कल्चरल फाउंडेशनचा २० वा. वार्षिक संगीत महोत्सव चिखली, कुदळवाडी येथे माता अंजनी हनुमंत मठ याठिकाणी साजरा..

Spread the love

प्रभात कल्चरल फाउंडेशनचा वार्षिक संगीत महोत्सव थाटात साजरा..Annual Music Festival of Prabhat Cultural Foundation celebrated in grand style..

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी, ४ डिसेंबर.

प्रभात कल्चरल फाउंडेशनचा २० वा. वार्षिक संगीत महोत्सव चिखली, कुदळवाडी येथे माता अंजनी हनुमंत मठ याठिकाणी साजरा झाला. सुरूवातीला प्रविण पोकरणा यांच्याहस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सुजित गौरशेटे यांचे गायन झाले. त्यांनी ‘राग बागेश्री’ उत्तम सादर केला.त्यानंतर वैजयंती भालेराव यांचे सुगम गायन झाले, त्यांनी ‘प्रभाची सुर है’ आणि ‘जिथे सागरा धरणी मिळते हे’ भाव गीत गाऊन रसिकांची मने जिंकली.

यानंतर पुरस्कार वितरण झाले पै. बबुमिया बँडवाले हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गुलामअली भालदार यांना प्रवीण पोकरणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, प्रभात कल्चरल फाउंडेशन युवा पुरस्कार वैजयंती भालेराव यांना माननीय तात्या सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गुरूवर्य पंडित पद्माकर बुवा कुलकर्णी पुरस्कार, प्रशांत पवार यांना विकास साने सर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. फाउंडेशन चे हे २० वे वर्ष आहे. कार्यक्रमाला साथ सांगत संतोष साळवी, हरिभाऊ, चंद्रशेखर पखवाज, पवन झोडगे यांनी केले.

कार्यक्रमाचे उत्तरार्धात प्रसिद्ध गायक प्रशांत पवार यांचे गायन झाले. या कार्यक्रमास विशेष सहकार्य  तात्या सपकाळ, प्रवीण पोकरणा, चिखलीचे मान्यवर डॉ. अजय व विजय ताम्हाणे, शिवाजी जांभूळकर तसेच विकास इन्फो टक चे विकास सर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर बावने तसेच, आभार प्रदर्शन कु. शगुफ्ता सय्यद यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!