ताज्या घडामोडी

दहाविच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला शाळेला मिनी प्रोजेक्टर.

सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात आंबवणे येथे कार्यक्रम संपन्न.

Spread the love

दहाविच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला शाळेला मिनी प्रोजेक्टर.Ex-students of class 10 gave mini projectors to the school.

आवाज न्यूज : आंबवडे प्रतिनिधी, ७ डिसेंबर.

सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात आंबवणे येथे सन 2010- 11 च्या इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याला घडवणाऱ्या शाळेला मदतीचा हात म्हणून मिनी प्रोजेक्टर भेट दिला.

याप्रसंगी दिनेश दळवी, संजय मानकर
लक्ष्मन हिरवे प्रदीप हुंडारे, पियुष मोढवे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार वाळंज यांनी शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा. असे आवाहन केले होते.त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.

भटू देवरे मुख्याध्यापक, व रविंद्र सोनवणे, संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर शिक्षक – कर्मचारी यांच्या कडे मिनी प्रोजेक्टर सुपूर्त केला.
नवीन तंत्रज्ञानातून शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य घटक समजणे अधिक सोपे व आनंददाई होईल  देवरे यांनी सांगितले व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेस मदत केल्यावर समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!