क्रीडा व मनोरंजनमुळशी

स्व.यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव अंतर्गत आंबवण्यात, केंदस्तरीय स्पर्धा आयोजन.

Spread the love

स्व.यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव अंतर्गत आंबवण्यात, केंदस्तरीय स्पर्धा आयोजन.Organized center level competition in fermentation under Mr. Yashwantrao Chavan Art, Sports Festival.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ७ डिसेंबर.

जिल्हा परिषद केंद्रशाळा आंबवणे ता.मुळशी येथे “यशवंतराव चव्हाण” कला,क्रीडा महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या.सर्वात आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत आंबवणे च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.सीता मच्छिंद्र कराळे,उपसरपंच.सुनील हुंडारे तसेच ग्रामपंचायत सदस्य-श्री.शरद जगताप, निलेश मेंगडे, मेघा नेवासकर, अक्षरा दळवी, आंबवणे शा.व्य. समिती अध्यक्ष.आशा मोडवे, सदस्य.मनोज जंगम संगिता नेवासकर,भानुदास पारकर, आंबवणे केंद्राचे केंद्रप्रमुख विकास रासकर, मान्यवर व केंद्रातील शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.या वेळी भजन,लोकनृत्य, कबड्डी,खोखो,धावणे,गोळा फेक,थाळी फेक,लांब उडी,उंच उडी,प्रश्नमंजूषा व वक्तृत्व इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.विजेत्या स्पर्धकांचे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले व प्रमाणपत्र देण्यात आले.
उपसरपंच सुनील हुंडारे सदस्य शरद जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेत सहभागी केंद्रातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.विजयी खेळाडूंना बिटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्र शाळेचे शिक्षक लक्ष्मण येंदे यांनी सूत्रसंचालन केले. व  नलिनी फुलपगारे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षक शाम बेंद्रे, लक्ष्मण येंदे, नलिनी फुलपगारे, राजू चिंचकर, रेश्मा झावरे,.सीमा पाटील, रामचंद्र मदगे, मारोती सूर्यवंशी, भीमराव आखाडे,
मनीषा कंदे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!