नगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने व इतर सर्व आस्थापनांनी, नामफलक मराठी भाषेत व देवनागरी लिपित लिहिणे बंधनकारक.ममता राठोड,उपमुध्याधिकारी.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने व इतर सर्व आस्थापनांनी, नामफलक मराठी भाषेत व देवनागरी लिपित लिहिणे बंधनकारक. ममता राठोड,उपमुध्याधिकारी.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने व इतर सर्व आस्थापनांनी सामान्य प्रशासन विभाग तळेगाव दाभाडे नगरपरिषद महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम १९६१ च्या कलम २० अ च्या अंमलबजावणीबाबत.

उपरोक्त उल्लेखित बाब ही मुबंई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ मध्ये अंतर्भुत होणारी सर्व दुकाने, संस्था, वाणिज्यिक आस्थापना, निवासी हॉटेल्स, आहारगृहे, खाद्यगृहे नाट्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची करमणुकीची व इतर ठिकाणे यांना लागू होत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने व इतर सर्व आस्थापना यांना सुचीत करणेत येत आहे की, आपल्या आस्थापनेचा नामफलक मराठी भाषेत व देवनागरी लिपित लिहिणे बंधनकारक केले असलेबाबत यापुर्वी शासनाने अधिसुचना दि. ०७/०९/१९८१ अन्वये स्पष्ट केलेले आहे.

तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १७/०३/२०२२ अन्वये मराठी भाषेतील अक्षर लेखण नाम फलकावर सुरुवातीलाच लिहिणे अवश्यक असेल. आणि मराठी भाषेतील अक्षरांना टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. असे निर्देश दिलेले आहेत. याची अंमलबजावणी करणे सर्व आस्थापनांवर बंधनकारक राहील. अशी सुचना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुध्याधिकारी, ममता राठोड यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!