क्राईम न्युजताज्या घडामोडीमावळलोणावळा

सहा.पोलीसअधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैधरित्या दारु वाहतूकीवर पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६० /- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई.

Spread the love

सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्येअवैध रित्या दारु वाहतूकीवर पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६० /- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ७ डिसेंबर.

 

उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांना पुणे ते आपटी अशी दारु वाहतूकीचा अगर बाळगणेचा कोणताही परवाना नसताना एका पॅगो टेम्पोमधून दारुची वाहतूक करीत आहे अशी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेवरुन त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीणपोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह मौजे अपटी गावचे हद्दीमध्ये पुणे ते अपटी रोडवर दबा धरून पॅगो कंपनीचा टेम्पो नं. MH12TU1473 व त्यामधील कि. रु.९६,६६०/- रुपयांची दारु असा एकूण२,४६,६६०/- रुपयाचा माल काल दि. ०६/१२/२०२३ रोजी पकडून त्यावरील चालकाविरुध्द लोणावळा ग्रामीणपोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल करीत कारवाई केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक. अकित गोयल , मा. अपर पोलीसअधीक्षक पुणे .मितेश घट्टे साो. व मा. सत्यसाई कार्तिक साो.सहा.पोलीस अधीक्षक, लोणावळाविभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली वाचक सहा. पोलीस निरीक्षक , सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक, भारत भोसले, पो. हवा. सिताराम बोकड, पो. ना. / किशोर पवार, पो. शि. सुभाष शिंदे यांनी सदरची कारवाई केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!