आरोग्य व शिक्षणनगरपरिषदमावळ

कचरा व्यवस्थापनचे पेमेंट थांबवा. योगेश पारगे

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टमध्ये अनियमितता असल्याची तक्रार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली..

Spread the love

कचरा व्यवस्थापनचे पेमेंट थांबवा.
योगेश पारगे.Stop paying waste management.Yogesh Parge.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टमध्ये अनियमितता असल्याची तक्रार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. सदर कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशी कमिटी नेमून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार होता, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता असा कुठलाही अहवाल प्राप्त झालेला नाही असे निदर्शनास आलेले आहे.

त्यामुळे हे सिद्ध होत आहे की कचरा कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा बडा अधिकारी कचरा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. तरी घाईघाईत सदर बडा अधिकारी कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट काढण्याच्या मार्गावर असून सदर पेमेंट जिल्हाधिकारी यांनी थांबवावे व कचरा कॉन्ट्रॅक्टची रीतसर चौकशी करणे अपेक्षित असल्याचे तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!