ताज्या घडामोडी

खास महिलांसाठी नाचणी,भगर, वरई, बाजरी, ज्वारी यांच्या पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

खास महिलांसाठी नाचणी,भगर, वरई, बाजरी, ज्वारी यांच्या पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन.Organizing cooking competition of dishes made from Nachini, Bhagar, Varai, Bajri, Sorghum specially for women.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ डिसेंबर.

शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी वेळ दुपारी ३ ते ६
राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त दत्त गुरू गोशाळा सोमाटणे येथे खास महिलांसाठी नाचणी,भगर, वरई,बाजरी ज्वारी यांच्या पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांच्या पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे.

त्यासाठी खास पाच बक्षिसे देण्यात येतील. मिलेट्स किंव्हा श्री धान्य याचे महत्व यावर वैद्य कोमल गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.तसेच वैद्यनाथ व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या तर्फे सर्व रोग निदान व उपचार असे शिबीर देखील आयोजित केले आहे.

जास्तीत जास्त महिला भगिनींनी, स्पर्धेत सहभागी होण्याची   आयुर्वेद व्यासपीठ पिंपरी चिंचवड शाखा,श्रीदत्त गुरू गोशाळा सोमाटणे यांनी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!