ताज्या घडामोडी

जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

पुरस्कार प्रदान सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह व कलादालन घोले रोड क्षत्रिय कार्यालय पुणे घोले रोड पुणे या ठिकाणी रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी ५ ते ८ वाजता होणार आहे.

Spread the love

जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.Organized public awareness program on the occasion of World Human Rights Day.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, ९ डिसेंबर.

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इंन्सिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती, संस्था संघटना यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे या हेतूने त्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थांचे पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. पुरस्कार प्रदान सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह व कलादालन घोले रोड क्षत्रिय कार्यालय पुणे घोले रोड पुणे या ठिकाणी रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी ५ ते ८ वाजता होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य सुधाकरराव जाधवर सर आहेत. तर प्रमुख अतिथी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश सोनल पाटील, मा. आर. व्ही. जटाळे – (निवृत्त न्यायाधी सत्र न्यायालय – अध्यक्ष पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग), पोलीस उप आयुक्त संदीप सिंग गिल, मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर (जी. एस. टी. आयुक्त), समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव, ॲड. असीम सरोदे, सुभाष वारे, युवराज ढमाले, श्याम आगरवाल संपादक. दैनिक आज का आनंद शार्दूल जाधवर,  तहसीलदार मदन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा मानवाधिकार पुरस्कार (शैक्षणिक क्षेत्रातून) मा. संजय चोरडिया, (विधीसेवा) – ॲड. रशीद सिद्धीकी, (कामगार क्षेत्र), सुरेश केसरकर (कोल्हापूर), (प्रशासकीय सेवा) पी. बी. माळी. (सामाजिक क्षेत्रातून) – शमीभा पाटील, (उद्योग क्षेत्रातून) रविराज धायगुडे यांना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने संविधान प्रचारक लोक चळवळ, दिलासा संस्था पिंपरी चिंचवड पुणे, यांचा सन्मान होणार आहे तर विशेष कार्य सन्मान पुरस्कार, संविधान सखी संघटन मुंबई, अखिल भारतीय महिला शक्ती सेना पुणे, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन, संघटित कष्टकरी कामगार संघटना बार्शी, ग्राहक हक्क संरक्षण समिती पुणे, महिला बचत गट पुणे, घर बचाओ घर बनवून आंदोलन संघटन मुंबई, सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बार्शी या संस्थांच्या सामाजिक कार्याला नव्या  संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने विशेष कार्य सन्मान पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष. विकास कुचेकर, संचालक अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, मनीष देशपांडे, हरिभाऊ मंजुळे, कधी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!