अध्यात्मिकमावळसामाजिक

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी ग्राम प्रदक्षिणा संपन्न.

पारंपारिक वाद्यांच्या तालावर व नाथांच्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण झाली.

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी ग्राम प्रदक्षिणा संपन्न ; पारंपारिक वाद्यांच्या तालावर व नाथांच्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण झाली.Chhabina Palkhi of village deity Sri Dolasnath Maharaj completes village pradakshina; Pradakshina was completed to the beat of traditional instruments and the chanting of Naths.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ डिसेंबर.

गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी नगारा, शिंगाडा, डऊर,गोंधळी, भजनी मंडळाच्या तालावर, टाळ-मृदंगाच्या गजरात व डोळसनाथांचा चांगभले -भैरीचा चांगभले, जोगेश्वरी मातेचा उदो उदो म्हणत प्रदक्षिणा पूर्ण झाली.

असंख्य महिला व पुरुषभजनी मंडळी,ग्राम पुरोहीत रेडे परिवार, नित्य सेवेकरी गुरव परिवार, पालखीचे मानकरी भोई समाज, ढेंबे(गोंधळी), आढागळेपरिवार (शिंगाड), भराडी परिवार, श्री डोळसनाथ मंदीर ट्रस्ट, श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, श्री डोळसनाथ तालीम मंडळ, महिला भगिनी, सर्व समाजाची भाविक भक्त व समस्त गावकरी समवेत दाभाडे सरकारच्या राजवाड्या समोरुन ग्रामप्रदक्षिणेसाठी मोठ्या जनसमुहात मार्गक्रमण झाली.

सरदार दाभाडे (सरकार) यांच्या राज वाड्या समोरून-गणपती चौक- देवीची आरती म्हणून. भोईआळी -डाळ आळी- राजेंद्रचौक-पुन्हा गणपतीचौक-चावडी चौक- प्रभू श्रीराम मंदीर समोरून,दाभाडे आळी मार्ग- बनेश्वर चौक पुन्हा श्रीं च्या मंदिरात स्थानापन्न झाली.

तद्नंतर नेहमीप्रमाणे समस्त भजनी मंडळी काल्याचा अभंग घेऊन, सर्व आरत्या झाल्या त्यात विशेष भराडीच्या डऊर(डमरु), गोधळीचे संभळ, झांज-ढोल वाजवून, शंख-घंटाच्या गजरात सुमधूर आवाजात आरत्या झाल्या व सर्व भाविक भक्ताना महाप्रसाद देऊन श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहा ची आनंदात – उत्साहाने गोड सांगता झाली.

देवाच्या जन्मोत्सव सोहळ्यात रोज पहाटे अभिषेक-महापुजा. भजन,महिला-हरीपाठ, दीप-प्रज्वलन, कालभैरवा ष्टक, स,शिवस्तुती,आरती, कीर्तन, महाप्रसाद होत असत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!