मावळराजकीय

मतदार यादीतील जाणून बुजून केलेला घोळ दुरुस्त करा.

मावळ काँग्रेस कमिटीची मागणी.. मिलिंद अच्युत प्रवक्ता.

Spread the love

मतदार यादीतील जाणून बुजून केलेला घोळ दुरुस्त करा.मावळ काँग्रेस कमिटीची मागणी..Correct the deliberate mess in the voter list. Maval Congress Committee’s demand..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ जुलै.

 

सुरू असणाऱ्या मतदार याद्या दुरुस्ती अभियानांतर्गत, प्रत्येक वार्ड निहाय मतदारांचे, संपूर्ण परीक्षण करणे गरजेचे असून, प्रत्येक वार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदवण्यात आले आहेत असे पत्र मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रवक्ता मिलिंद अच्युत यांच्या सहीने तहसीलदार मावळ विक्रम देशमुख यांना देण्यात आले.

अनेक मतदार हे त्या वार्ड मध्ये राहत नसून मावळ तालुक्यातील इतरत्र ठिकाणी राहत आहेत, अशा मतदारांची नावे सदर वार्ड मधून सखोल परीक्षण केल्यानंतर वगळण्यात यावीत व सदरचे मतदार जेथे राहत आहेत तेथेच त्यांची नावे समाविष्ट करण्यात यावीत, त्यामुळे अशा बोगस नाव नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील आपण कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

वार्ड निहाय मतदारांची नोंदणी करत असताना इतरत्र राहणाऱ्या, मतदारांची नावे वगळून स्थानिक मतदारांना मतदार यादीत स्थान द्यावे जेणेकरून बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे प्रवक्ता मिलिंद अच्युत यांनी नमूद केले आहे.

तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या वतीने सहाय्यक माणिक साबळे यांनी पत्र स्वीकारले यावेळी मावळ प्रवक्ता मिलिंद अच्युत ,तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर दाभाडे, कार्याध्यक्ष योगेश, पारगे संघटक दत्ता पारगे, टीकाराम सोनार ॲड निवृत्ती फलके आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!