क्रीडा व मनोरंजनमुळशी

नंदकुमार वाळंज यांना मृदूंग तालसाधना गुरुकुल संस्थेचा जीवनगौरव सन्मान

Spread the love

नंदकुमार वाळंज यांना मृदूंग तालसाधना गुरुकुल संस्थेचा जीवनगौरव सन्मान Mridung Talsadhana Gurukul Institute Lifetime Achievement Award to Nandkumar Valanj

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, १९ डिसेंबर.

मृदुंग तालसाधना, वारकरी गुरूकुल संस्था आयोजित कुळेगाव मुळशी येथे संस्थेचा वर्धापनदिन, व गुरूपुजन सोहळा, तसेच जीवनगौरव पुरस्कार सोहळा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

संस्थेचे ह भ प शुभम महाराज शिंदे यांच्या पुढाकाराने चौथा वर्धापन दिन साजरा करताना पं. सुरेश पत्की यांचे गायन, पं प्रमोद गायकवाड यांचे शहणाई वादन, तर सुप्रसिद्ध तबला वादक विनायक गुरव यांचे तबला वादन सादर करण्यात आले. तसेच हभप संतोष महाराज पायगुडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

श्रीहरी महाराज रेड्डी, कृष्णा साळुंखे , तुकाराम शिंदे, महेश शिंदे यांचे गुरुपूजन केले.समाजात विशेष कार्य करणाऱ्या
हभप किसन महाराज भोईर, जेष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, हभप शिवाजी हगवणे, दत्तात्रय साठे, पत्रकार सचिन केदारी, उद्योजक स्वप्नील सणस आशा सेविका संगीता ढाकुळ यांचा विशेष सन्मान केला.या कार्यक्रमांमध्ये आंबवणे गावातील भूमी पुत्र व मुळशी -मावळ भूषण, वारकरी भुषण ; व जेष्ठ समाजसेवक कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.नंदकुमार वाळंज यांना पुणे जिल्यात केलेल्या
शैक्षणिक, सामाजिक, वारकरी क्षेत्रातील अतुलनीय कार्यामुळे या गुरुकुल संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.

मृदूंग तालसाधना गुरुकुल संस्थेचे ह भ प शुभम महाराज शिंदे यांनी मा. नंदकुमार वाळंज यांची निवड केली.व मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुष्पहार, शॉल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.वाळंज विद्यालयातील मुख्याध्यापक  भटू देवरे व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला.समाजातून सर्वच स्तरातून बाबूजी यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!