ताज्या घडामोडी

निमगाव केतकी येथे कला क्रीडा महोत्सव संपन्न.

Spread the love

निमगाव केतकी येथे कला क्रीडा महोत्सव संपन्न.Art Sports Festival concluded at Nimgaon Ketaki.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २० डिसेंबर.

निमगाव केतकी-दि.१८-पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापुर यांचे सयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे संपन्न झाला.

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते अतुल मिसाळ,शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुगळे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे, केंद्रप्रमुख मारुती सुपुते,केतकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य आर.डी.चव्हाण,काटेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य मनिषा भोसले यांचे हस्ते करुन करण्यात आले.या स्पर्धेत निमगाव. केतकी, व्याहाळी, काटी, शेळगाव व निमसाखर केंद्रातील प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.

परीक्षक म्हणून माध्यमिक शिक्षकांनी सहकार्य केले.तसेच केंद्रसमन्वयक राजकुमार राजगुरु,राजेंद्र भोंग,राजकुमार भोंग यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन किरण म्हेत्रे यांनी केले.विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे-आलेले प्रथम क्रमांक ५० मी धावणे(लहान गट)ए मुले/मुली

१)श्रेयश महादेव चव्हाण-सराफवाडी
१)समृद्धी महादेव दिवसे-व्याहाळी

१०० मी धावणे(मोठा गट) मुले/मुली
१)ओम महेंद्र पांडवे-व्याहाळी
१)शिवानी मंगेश मोरे-व्याहाळी

धावती उंच उडी(लहान गट)मुले/मुली
१)प्रतीक सुरेश वायसे-कडबनवाडी
१)सानिका भागवत गावडे-कडबनवाडी

धावती उंच उडी(मोठा गट)मुले/मुली
१)ओंकार सुरेश तनपुरे-व्याहाळी
१)दिव्या अण्णासो बरळ-व्याहाळी

लांब उडी(लहान गट)मुले/मुली
१)धनश्री नवनाथ जाधव-शिंगाडेवस्ती
१)दर्शन अशोक परांडे-परांडेवस्ती

लांब उडी(मोठा गट)मुले/मुली
१)ओंकार सुरेश तनपुरे-व्याहाळी
१)गौरी दैवत शिंदे-व्याहाळी

प्रश्नमंजुषा-(लहान गट)
१)जि. प.शाळा भोसलेवस्ती-सिद्धी राऊत व प्रताप जौजाळ.

लेझीम(लहान गट)मुली
१)जि.प.प्राथ. शाळा कौठळी.

लेझीम (मोठा गट)मुली
१)जि.प.प्राथ. शाळा व्याहाळी.

भजन स्पर्धा(लहान गट)
१)जि.प.प्राथ.शाळा जानाईमळा.

वक्तृत्व स्पर्धा–लहान गट
१)मुग्धा वसंत कणसे-माळीवस्ती

वक्तृत्व स्पर्धा–मोठा गट
१)सिया उमेश बरीदे-व्याहाळी

लोकनृत्य–लहान गट
१)जि.प.प्राथ.शाळा माळीवस्ती.

लोकनृत्य–मोठा गट
१)जि.प.प्राथ. शाळा व्याहाळी

कब्बडी(लहान गट)मुले/मुली
१)जि.प.प्राथ.शाळा राऊतशेळके वस्ती.
१)जि.प.प्राथ.शाळा भोसलेवस्ती

खो खो– लहान गट–मुले/मुली
१)जि.प.प्राथ.शाळा कडबनवाडी
१)जि.प.प्राथ.शाळा कडबनवाडी.

थाळी फेक/गोळा फेक (मुले/मुली)-मोठा गट
१)जि.प. प्राथ.शाळा व्याहाळी.

सर्व स्पर्धकांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!