आरोग्य व शिक्षण

तळेगावात ओबीसी जागर रथाचे स्वागत

Spread the love

तळेगाव: राज्यात ओबीसी आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनात जनजागृती अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत ओबीसी जागर रथ ही संकल्पना राबवली जात असून या रथाचे शनिवारी तळेगावात आगमन झाले.

 

तळेगाव स्टेशन परिसरात रथाचे स्वागत भाजपा ओबीसी मोर्चाचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष नितीन पोटे यांनी केले. तर रथाचे पूजन भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा निर्मला पोटे व मृदुला भावे यांनी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भाषणे पडद्यावर दाखविण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, कार्याध्यक्ष सचिन जाधव, रोहिदास जांभूळकर, आशुतोष हेंद्रे, ऋषिकेश सुतार, अमित भागीवंत, ज्ञानेश्वर गुंड, जकराया मल्हाळे, कृष्‍णंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!