ताज्या घडामोडी

चेतन ठाकरे यांना महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. १४
ब्लु स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्थेमार्फत रविवारी पंढरपूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. या सोहळ्यामध्ये पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र चेतन रमेश ठाकरे सरांना यावर्षीचा “महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष महादेव भालेराव, नगरसेवक महादेव धोत्रे, संस्थेचे अध्यक्ष चंदन बनसोडे,निलेश हांडे , दीप्ती हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चेतन ठाकरे यांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थीभिमुक, विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयामध्ये हा पुरस्कार मिळविण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!