अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्र

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्रीदत्त जयंती उत्साहात व शांततेत संपन्न.

नारायण महाराज यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत अभिषेक झाल्यानंतर होमहवन विधी झाला.

Spread the love

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्रीदत्त जयंती उत्साहात व शांततेत संपन्न.Sridatta Jayanti was celebrated with enthusiasm and peace at Srikshena Narayanpur.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर , लोणावळा प्रतिनिधी, २७ डिसेंबर.

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्रीदत्त जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली.ता.२५ रोजी येथे होमहवन , नामजप झाला. पहाटे श्री दत्तमहाराजांचे मंदिरात अभिषेक, पूजा व आरती झाली.सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात श्री दत्तजन्म झाला.श्री दत्ताचे पाळण्यात नाव ठेवण्यात येवून पाळणा गाण्यात आला.

यावेळी प्रमुख विश्वस्थ ह.भ.प.नारायणमहाराज यांनी प्रवचन केले. आरतीनंतर कीर्तनाचा व लक्ष्मण राजगुरू यांचा भारूडाचा कार्यक्रम झाला.काल पहाटेपासूनच श्री दत्तमहाराज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई केली असून नारायण महाराज यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत अभिषेक झाल्यानंतर होमहवन विधी झाला.यानंतर आरती झाली, प्रवचन झाले.

सकाळी दर्शनास गर्दी होऊ लागली. दुपारी साडेदहा अकरा वाजता आरती झाली. त्यानंतर देव पालखीत ठेवून पालखी मंदिर व ग्रामप्रदक्षिणा साठी निघाली. विविध मंडळांचे ढोलताशांच्या खेळाने, बँजो पथकांनी, मिरवणुकीला शोभा आणली. हौदाजवळ स्नान विधी आटोपून पालखी मानकरी यांनी खांद्यावर घेवून ग्रामप्रदक्षिणा करून मंदिरात आली. यानंतर महाराजांनी आरती घेतली. चार प्रबोधनात्मक गोष्टी सांगितल्या.

यावेळी काही मानकरी, ढोल, ताशा, बँजो, बँड पथके यांचा महाराजांचे हाताने व मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.माधुकरी अन्नदान व दर्शनबारी राञी अकरापर्यत सुरू होती.राञीही तीन मंदिरात पालखीची प्रदक्षिणा झाली. भजनाचे तालात कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!