नगरपरिषदमावळ

चुकीच्या अकाउंट वर फंड ट्रान्सफर झाल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मिलिंद अच्युत

रक्कम कचरा ठेकेदाराला न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही.

Spread the love

चुकीच्या अकाउंट वर फंड ट्रान्सफर झाल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मिलिंद अच्युत There should be a high-level inquiry into the transfer of funds to the wrong account. Milind Achyut

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात येणाऱ्या रकमेचा आरटीजीएस एप्लीकेशन फॉर्म वर अकाउंट नंबर चुकीचा लिहिल्याने शासनाची पर्यायाने जनतेच्या टॅक्स स्वरूपातील रकमेची हेळसांड झाली आहे.

सुमारे १ करोड ४९ लाख ३९ हजार २७९ रुपये व २१ लाख १४ हजार ७२६ इतकी रक्कम हलगर्जी पणामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमावर्ग झाली आहे, सदर रक्कम कचरा ठेकेदाराला न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. सदर सर्व प्रकार गंभीर असून नगरपरिषदेचे प्रमुख या नात्याने मुख्याधिकारी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. सदर घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने नजर चुकीने घडला आहे किंवा त्यामागे काही खोडसाळपणाचा उद्देश आहे ? याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मिलिंद अच्युत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!