अध्यात्मिकमावळसामाजिक

 श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव..

Spread the love

 श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव साजरा.Happy celebration of Navratri festival in Shree Dolasnath temple.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर . २२ ऑक्टोबर.

तळेगाव येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज  मंदिरात नगरपरिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थिनींनी नवरात्र उत्सवात आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थिनी व शिक्षकांनी भोंडला, दांडिया, फुगड्या खेळून हा आनंद साजरा केला. महिलांनी विद्यार्थिनींचे पूजन करून त्यांना सन्मानित केले.

डोळसनाथ महाराज मंदिरातील शारदिय नवरात्रोत्सवात तळेगाव दाभाडे नगर परिषद,सरसेनापती उमाबाई दाभाडे,शाळा क्र-४च्या विद्यार्थिनींनी भोंडला,दांडीया,व फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला.

मंदीर परिसातील महिला भगिनींनी कंन्यापुजन करुन सर्व मुलींना  पेन दिले व शिक्षकवृंदासह हळदी-कुंकु समारंभ केला. यावेळी अनिता तिकोने, निकीता शितोळे,जयश्री पावसे, वैशाली साबळे, साबळेसर उपस्थित होते.

मंदिरात नवरात्रीनिमित्त रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ, स्वामी समर्थ केंद्र कडोलकर कॉलनी यांचे श्री सुक्त पठण, नवार्नव मंत्र, देवीचे जप, ५ ते ६ भजन व हरिपाठ, श्री डोळसनाथ भजनी मंडळाची ६ ते ७ देवीची गाणी, जोगवा व ८:00 वा श्रींची व संबळाच्या निनादात देवीची आरती होत असते.

नवमीला नवचंडी याग (हवन) व दसऱ्याला छबिना पालखी सायंकाळी ६ वा मंदिरातून नगारा, टाळ मृदंगाच्या गजरात, भजनी मंडळ व ग्रामस्थांसमवेत ग्राम प्रदक्षिणेसाठी निघेल. पुन्हा मंदिरात आल्यावर श्री व देवीची  आरती होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!