ताज्या घडामोडी

मम्मा प्रि स्कूल” मध्ये माजी प्राचार्य विश्वासराव सायनाकर सर यांच्या प्रमुख उपस्थित “शिवजयंती” साजरी

Spread the love

नेर्ले ( ता. वाळवा )

येथे ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित” मम्मा प्रि स्कूल” मध्ये आदरणीय माजी प्राचार्य विश्वासराव सायनाकर सर यांच्या प्रमुख उपस्थित “शिवजयंती” साजरी …… सविस्तर असे की, नेर्ले हे गांव आष्टपैलू असणारे गांव म्हणून प्रसिद्ध आहे, तसे पाहावंयास गेले तर शैक्षणिक वारसा असणारे गांव म्हणून नेर्ले गांव ओळखले जाते. यामध्ये ज्ञानदान शिक्षण संस्था संचालित ,मम्मा प्री. स्कूलचा प्रथम क्रमांक लगतो. सदरच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य विश्वासराव सायनाकर (सर) हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व मम्मा प्री स्कूलचे मार्गदर्शक संदीप मोहिते (सर) हे उपस्थित होते .आज मम्मा प्रि स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे, स्वराज्य जननी ताराराणी, अशा विविध महापुरुषांचे दर्शन झाले. आजच्या या कार्यक्रमामध्ये मम्मा प्रि स्कूलच्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘ वक्तृत्व ‘ स्पर्धेमध्ये “बाल शिवाजी” या विषयावरती भाषण केले. स्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांनी इंग्लिश हिंदी व मराठी या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाषण केल्यामुळे प्रमुख पाहुण्यांना स्कूल चे वेगळेपण अनुभवास भेटले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सायनाकर सर बोलत असताना…… मला एक नाही तर अनेक बाल शिवाजी बघायला मिळाले व भविष्यामध्ये या बाल शिवराया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व आचार- विचारांचे गुण यावेत अशी शुभकामना सर्व विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप मोहिते (सर) यांनी सर्व मुलांचे कौतुक केले, तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल दर्शू जगताप (मॅडम) यांनी केले, या कार्यक्रमाचे प्रमुख स्कूलच्या शिक्षिका प्राजक्ता पाटील (मॅडम) यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले, तर स्कूलच्या शिक्षिका वर्षाराणी वेटम (मॅडम) यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा पार पडली, त्याच बरोबर श्रद्धा जाधव (मॅडम) यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला… या कार्यक्रमाचे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण इव्हेंट गुरुजी या यूट्यूब चैनल चे विशाल कुमार पाटील. व प्रमोद रणखांबे. यांनी केले त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच बहारदार झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!