ताज्या घडामोडी

येळापूर-गवळेवाडी कुस्तीमैदानात अरुण बोगरडे विजयी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येळापुर-गवळेवाडी येथे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची हणमंत पुरी विरुद्ध अरुण बोंगारडे अशा लढतीत अरुण बोगरडे याने हणमंत पुरी याच्यावर पोकळ घिस्सा डावाने विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकाच्या अमर पाटील यास शशिकांत बोंगारडे याने नाक पट्टी डावावर चितपट केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अक्षय मोहीते हा जखमी झाल्याने अभिजित भोसले यास विजयी घोषित करण्यात आले.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन विठ्ठल लोहार, माजी विस्तार अधिकारी सुभाष लाड, गवळेवाडी लोकनियुक्त सरपंच बाबा गोळे, माजी सरपंच जयवंत कडोले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मैदानातील इतर विजयी मल्ल असे किरण पाटील, अजय शेडगे,दत्ता बानकर, ओमकार जाधव, कर्तार कांबळे, आशुतोष लाड,विशाल जाधव,धिरज पाटील, विवेक लाड,प्रवीण हरणावळ,नितीन माने,साहिल पाटील,प्रवीण शेवाळे,अतुल चौगुले, मयूर जाधव, गणेश पवार, आर्यन माने,वैभव पाटील, विजय जाधव, सचिन पाटील,ओंकार पवार,आदित्य लाड,सुरज गोळे, स्वीकार सावंत,सुहास गोळे,तुषार वाघमारे,शुभम जाधव सौरभ पाटील.१ ते १० पर्यंतच्या सर्व विजयी मल्लांना माजी विस्तार अधिकारी सुभाष लाड यांच्या तर्फे कायम शिल्ड देण्यात आल्या.
पंच म्हणून दत्ता आंदळकर,राहुल गायकवाड (फौजी),राजाराम यमगर, राहुल जाधव यांनी काम पाहिले. सर्वेश शिंदे,सागर लाड, राहुल गायकवाड, बाळू वाघमारे,आबा शिंदे, संदीप लाड,विजय अटकेकर यांनी संयोजन केले. मैदानासाठी अलोम्पिकविर बंडा पाटील-रेठरेकर, कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड,प्रचितीचे संचालक सुरेश चिंचोलकर,बाजार समिती संचालक दिनकर दिंडे,काळूद्रे सरपंच विजय पाटील,सरपंच मारुती कांबळे,माजी सरपंच जयवंत कडोले,विकास शिरसट,जगन्नाथ कांबळे,आबा शिंदे,दत्ता हाप्पे, विजय अटकेकर,सुनील हाप्पे, बबलू हाप्पे, युवराज हाप्पे आदी प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!