आरोग्य व शिक्षण

हिजाब का अजीब ही हिसाब है – लेखक हर्षल आल्पे

Spread the love

आवाज न्यूज : सध्या बातम्यांमध्ये हिजाब बद्दल बरीच चर्चा आहे , हिजाब आणि उपरणे खर तर या वर वाद घालावा अशा या गोष्टी पण नाही ,आणि शैक्षणिक ठिकाणांमध्ये खरच या गोष्टींना अति महत्व नसले पाहिजे ,कारण तिथे आपण शिक्षण घ्यायला जातो ,तिथे उद्देश वेगळा असतो , शिक्षण जिथे येते तिथे तुमची जात , धर्म , अजून काही काही येतच नाही , आणि विद्यार्थी जीवनात जर आम्ही एकतेच महत्व जर पटवून देऊ शकत नसू ,तर हे आपले अपयश आहेच

लहानपणी आपले शिक्षक एकतेच महत्व शिकवण्यासाठी हे वेगवेगळ्या क्लूप्त्या काढायचे , मग ते एकत्र डबा खायला बसणे असो , किंवा मुलीशेजारी मुलगा एकाच बाकावर बसवणे असो ,यातून आपण एकतेचे महत्व जाणायचो , जात , धर्म वैगरेंना तर थारा च नव्हता , त्या काळात मुलांना शिकवली जाणारी गाणी ही एकतेचे महत्व सांगणारीच होती , “हम होंगे कामयाब एक दिन” किंवा “इतनी शक्ति हमे देन दाता मन का विश्वास कमजोर होना” अशी बरीच गाणी आणि प्रार्थना आम्ही आत्मियतेने म्हणत असू , त्या काळातले मुलांना शाळेत अथवा कॉलेज मध्ये दाखवले जाणारे चित्रपट ही सर्व धर्म समभाव याचेच महत्व अधोरेखित करायचे .

एक सहज आठवण आली , एका संस्थेतर्फे आम्हाला संस्कार वर्गात पाठवले होते , पाठवले म्हणजे काय ? तर आम्ही जिथे खेळायचो तिथेच ते संस्कार वर्ग भरायचे , आमच्याच शाळेतले एक शिक्षक ते संस्कार वर्ग घ्यायचे , वेगवेगळे श्लोक आमच्याकडून म्हणवून , पाठ करवून घ्यायचे , त्यावेळेला त्याचे महत्व एवढे वाटत नसल्याने असेल किंवा खेळाकडे जास्त लक्ष असल्याने आम्ही तेवढे गांभीर्याने ते घेत नसू कदाचित , पण त्यात माझ्याबरोबर एक वसीम किंवा तत्सम नावाचा ज्याला आम्ही वसीम अक्रम म्हणून चिडवायचो असा मुलगा असायचा , तो ही आमच्याबरोबर खेळायचा , शाळेत एकत्र डबा ही खायचा , शिवाय तो आमच्या बाजूच्याच इमारतीत राहत असल्याने प्रत्येक सणात ते संपूर्ण कुटुंबच सहभागी व्हायचे . आम्ही ही ईद ला त्यांच्या घरी खीर खायला जात असू , जन्मात इतकी चविष्ट खीर कुणी बनवत नसेल इतकी चविष्ट खीर त्याची आई बनवायची . त्याचे अब्बू (वडील ) तर स्वत:च्या डोक्यावरून गणपती मिरवत घेऊन आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात यायचे , कुंभार वाड्यात आम्हाला त्यांच्या वाहनाने घेऊन जायचे आणि उत्कृष्ट गणपती ची मूर्ति निवडण्यात मदत ही करायचे . आखीव रेखीव असलेली मूर्ति बरोबर निवडण्यात त्यांचा हातखंडा होता . मूर्ति कशी पाहावी , त्याचे पावित्र्य कसे जपावे हे ते आम्हाला शिकवायचे . वसीम ला आमच्याबरोबर संस्कारवर्गात पाठवायचे ते , या वसीम ला गीतेतले श्लोक आमच्यापेक्षा जास्त पाठ होते , त्याला दरवर्षी बक्षिसे होती त्यात , आणि अशा या वसीम ला एक दिवस तू संस्कार वर्गात येऊ नकोस कारण तू त्या धर्माचा नाहीस , असे सांगितले गेले , आणि आम्हा अजून दोन तीन मुलांना त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेऊ नका असे ही सांगितले गेले , तेव्हा आमच्या बालमनाला ते पटले नाही , आम्ही मुलांनी त्या संस्कार वर्गाला जाणेच सोडून दिले . आम्हाला त्या पेक्षा आमची असलेली मैत्री जास्ती महत्वाची वाटली . घरच्यांनी ही या निर्णयाचे स्वागत च केले .

आपल्या सविधानाने वैयक्तिक आयुष्यात आपआपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार जरी दिला असला तरी कुणावर ही बळजबरी करण्याचे साफ नाकारले आहे , हा गुन्हा आहे , आणि हे माणुसकीला धरून नाही . राहिला प्रश्न हिजाब चा तर त्याची सक्ती होता कामा नये , आणि नाही त्यावरून राजकारण होऊ नये ,असे वाटते .

मुलांना त्यापेक्षा निर्मळ आणि निरपेक्ष शिक्षण द्या ना , तेच त्यांना खूप पुढे घेऊन जाणार आहे , व्यावसायिक आयुष्यामध्ये प्रगति करण्यासाठी हे तुमचे धर्म , जात हे काही सुद्धा उपयोगी नाही . उलट व्यावसायिक आयुष्यात तुम्ही जेवढे निरपेक्ष तेवढेच तुमचा व्यवसाय ,नोकरी यात प्रगतीच्या संधी अधिक उपलब्ध होऊ शकतात . कारण तुम्ही कुठलीच भिंत उभी करत नाही आहात . आज जे आपआपल्या व्यवसायात यशस्वी असलेले जे आहेत त्यांनी ही स्वताहाला जातीत , धर्मात , चालीरीतीत अडकवून नाही घेतले , ते साखळदंड त्यांनी तोडले म्हणून आज च नाही तर वर्षानुवर्ष आपण त्यांची नावे अदबीने घेतो . हे टाटा , बिर्ला , अंबानी परदेशातील उदाहरणे म्हणजे हे बिल गेट्स , मार्क झुकरबर्ग ह्यांचे धर्म आपल्याला कदाचित सांगता नाही येणार पण ह्यांनी केलेले काम त्याचे नाव मात्र आपण अदबीने घेतोच घेतो . आपली लोक परदेशात जाऊन आज मोठमोठ्या पदांवर बसल्याची ही अनेको उदाहरणे देता येतील . ते आपल्या धर्मामुळे नाही तर आपल्या शिक्षणामुळे , आणि केलेल्या अपार कष्टामुळे ते तिथे आहेत . त्यांना ते पद मिळवताना त्यांचा धर्म नाही विचारला गेला आणि नाही जात विचारली गेली ,कपडे तर दूरच राहिले . त्यांचे कर्तृत्व पाहिले गेले ,बास !

आणि आम्ही हे काय ? काय घालावे काय घालू नये यासाठी भांडतोय ? याच विषयात एक मुद्दा गंभीर आहे , ज्याची अधून मधून चर्चा कानावर येत असते ,आणि तो या विषयाचाच पुढचा खतरनाक भाग आहे , आणि तो म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेला राजकारणाचा शिरकाव , हा फार गंभीर मुद्दा आहे . राजकारण जिथे येते तिथे हे असले विषय काढून वाद तयार केले जातात , आणि तिथल्या शैक्षणिक संस्थानमधल्या निवडणुका जिंकण्यासाठी ही एक जाणीवपूर्वक केलेली रणनीती ही असते . फोडा आणि झोडा ही जशी इंग्रजांच्या काळात वापरलेली रणनीती होती , तीच रणनीती ही इथे वापरली जाते . मग त्यात कुणाला तरी आपला नेता बनवायचे ज्याच्याजवळ अजून पूर्ण ज्ञान नाही अशाला बक्षिसांची लालूच दाखवायची ,अन त्याला हिंसक असो वा आंहिसेने आपला मुद्दा लावून धरायला लावायचा आणि आपला जो काही स्वार्थ असेल तो पार पाडून घ्यायचा .हे असले खेळ हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले नाही पाहिजेत . यातून आपल्या देशाला , देशाच्या एकात्मतेला खूप मोठा धोका आपण च निर्माण करत आहोत . हे कुठे तरी थांबले पाहिजे . तर आणि तरच आपण , आपला देश खर्याे अर्थाने विकसित होईल . ये हिजाबोका , ये हिसाब यही रोक कर जनाब दिलो के मोहोब्बतों का और एकता का ये सही हिसाब होना चाहिए , तभी हमारा देश आगे बढ़ेगा ,तरक्की करेगा ।

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!