आरोग्य व शिक्षण

दिशा संस्थेमार्फत मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

Spread the love

मावळ : दिशा संस्था गेली २० वर्षांपासून मावळ तालुक्यातील महिला व युवती सक्षमीकरण व ग्रामविकासाचे कार्य करत आहे. या कार्यासाठी देसाई ब्रदर्स पुणे यांचे आर्थिक सहकार्य लाभलेले आहे.

गेल्या 2 ते 3 वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुबांतील व्यक्ती ह्या बेरोजगार झालेल्या आहेत. याचा परिणाम त्यांच्या कुटुबांवर व परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर देखील होत असल्याचे दिसून आल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून दिशा संस्थेचे अध्यक्ष श्री. ब्रिगेडीयर रघुनाथ जठार, विश्वस्त श्री. यशवंत लिमये व श्रीमती इंदु गुप्ता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. प्रविण भोईरकर यांनी दिशा संस्थेमार्फत व वडिवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, वेल्हवळी व उंबरवाडी या सहा गावातील ५१ गरीब, गरजू व होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या एकूण फी पैकी ५०% फी दिशा संस्थेमार्फत मुलींच्या शिक्षणासाठी दिली.ज्यामुळे मुलींचे पुढील शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली आहे .

या कार्यक्रमाला सुनिता थोरवे, स्नेहल थोरवे, वर्षा टाकळकर, प्रिती टाकळकर, ऋतुजा शिरसट, अनिता थोरात, प्रियंका वाघमारे, व ऋतुजा मोहीते, या ग्रामसखी उपस्थित होत्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!