आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांनी केले नववर्षारंभी संकल्प.

Spread the love

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांनी केले नववर्षारंभी संकल्प.Students of Kauthali School made New Year’s resolutions.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २ जानेवारी.

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शुभेच्छा देण्यासाठी भेटकार्ड तयार केली व प्रत्येकाने शुभेच्छा संदेशा बरोबरच एक संकल्प केला व तो माझा संकल्प म्हणून भेटकार्ड वर लिहिला. संकल्पामध्ये मी नियमित अभ्यास करेन, खोटे बोलणार नाही, मी नियमित व्यायाम करेन, वृक्षारोपण करेन, आई वडिलांना कामात मदत करेन, मोठ्या माणसांचा आदर करेन, मी डायरी लिहीन, गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करीन, जास्त वेळ मोबाईल पाहणार नाही, दररोज वर्तमानपत्र वाचेल, बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करेल, हट्ट करणार नाही, ताटात वाढलेले अन्न वाया घालवणार नाही, भाषणे पाठ करीन, पाढे-स्पेलिंग पाठांतर करेन अशा प्रकारचे अनेक संकल्प केले.

विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.उपशिक्षक अमित भोंग यांनी संकल्प व नवीन वर्ष याची माहिती सांगितली. यावेळी मुख्याध्यापक भारत ननवरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!