आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात संपन्न.

Spread the love

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात संपन्न.ए The annual convocation and prize distribution ceremony was concluded with enthusiasm at Swami Vivekananda English School.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,  २ जानेवारी.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे येथे गुरुवार (दि.28) ते शनिवार (दि.30) असा तीन दिवसांचा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न झाला.

स्नेहसंमेलनास प्रथम दिवशी प्रमुख पाहुणे लघुपट व वेब सिरीज अभिनेते ऋषिकेश कराळे,गणेश सातव, दीपक सातव, द्वितीय दिनी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार.सुनीलअण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा.सारिका ताई शेळके, व तिसऱ्या दिवशी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे असिस्टंट गव्हर्नर तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष रो‌. शंकर हदीमनी, मंजुषा हदीमनी,रो.सुमती निलवे,रो. सुनील खोल्लम, पत्रकार.जगन्नाथ काळे,रेखा भेगडे,जाधव गुरुजी , डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे,सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा.रजनीगंधा खांडगे,उपाध्यक्ष.दादासाहेब उर्हे,सचिव.मिलिंद शेलार सर,संचालक.श्रीराम कुबेर,खजिनदार.सुदाम दाभाडे, सल्लागार.शबनम खान, श्रीमती कुसुमताई वाळुंज,शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख,पर्यवेक्षिका रेणू शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख.तेजस्विनी सरोदे,प्राथमिक विभाग प्रमुख.धनश्री पाटील, माध्यमिक विभाग प्रमुख.सुजाता गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रंगमंचाच्या पूजनाने करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत,नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तद्नंतर शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख यांनी वार्षिक प्रगतीचा आढावा सादर केला.

अभिनेते ऋषिकेश कराळे, रोटरियन शंकर हदीमनी यांचा स्वागतपर सत्कार.मिलिंद शेलार सर, कुलस्वामिनी मंडळाच्या अध्यक्षा .सारिका ताई शेळके यांचा स्वागतपर सत्कार.रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका.शमशाद शेख, पर्यवेक्षिका.रेणू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वर्गीय कु.शलका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार ॲ.कु.शलाका संतोष खांडगे विद्यार्थी रत्न पुरस्कार:- कु.स्वरा धनवटे(सिनियर केजी रोज), कु. धर्मिष्ठा भेगडे(इ. ४थी क), कु.सुरक्षा कटरे (इ.9वी) या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला.
प्रतिवर्षी प्रत्येक वर्गातून दिला जाणारा बेस्ट स्टुडन्ट पुरस्कार यावर्षी कु.अनुष्का शिंगे(नर्सरी),कु. चंदन चौधरी (ज्युनिअर केजी रोज) कु.संस्कृती यादव(ज्युनिअर केजी जॕस्मिन),कु.सोनाक्षी पाठक (सीनियर केजी रोज)कु.रियांश उर्हे(सिनियर केजी जॕस्मिन)
इ.पहिली कु.शरण्या शिंदे(अ), कु.वेदांत सोनटक्के(ब), कु.शौर्य लोमटे(क)
इ. दुसरी कु.वेद चव्हाण(अ),कु.मयूर चव्हाण (ब),कु.राजवीर कदम(क)
इ.तिसरी कु.उर्मिला गावडे(अ), कु.सानवी जाधव(ब), कु.आर्या फाटक(क)
इ. चौथी कु.समर्थ बोडके(अ),कु.नवमी लुगडे(ब), कु.अंबिका मौर्य(क)
इ.पाचवी कु.पियुष बोगाटी(अ)कु.स्वरा यादव(ब)कु. मानसी चव्हाण(क)
इ.सहावी कु.शर्वरी पवार(अ), कु.अथर्व सलागरे(ब),कु.सोनाक्षी चव्हाण(क)
इ.सातवी कु.स्वराली पटाईत(अ), कु.स्वामिनी धोत्रे(ब) इ.आठवी कु.इकरा खान(अ),कु.सृष्टी चोपडे (ब),इ.नववी कु.करण जालोरा,इ.दहावी कु.मानसी मराठे(अ),कु.नेहा साळुंखे(ब)या विद्यार्थ्यांना देण्यात आला.

उत्कृष्ट वर्ग पुरस्कार 2023 चे विजेते वर्ग पूर्व प्राथमिक विभागातील सिनियर केजी रोज, प्राथमिक विभागातील इ.दुसरी (ब), माध्यमिक विभागातील इ. सहावी (क) यांना देण्यात आला.बेस्ट हाऊस यल्लो हाऊस हा ठरला. वर्षभर क्रीडा क्षेत्राच्या अंतर्गत व शालाबाह्य स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा चॅम्पियन ऑफ द इयर हा पुरस्कार कु. रोशनी गिरी (इ.8वी,अ) या विद्यार्थिनीस, शैक्षणिक,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कु. अमृता जाधव (इ.10वी,अ) या विद्यार्थिनीस,विविध स्पर्धांमधून व शालांतर्गत उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा स्टुडन्ट ऑफ द गुड कण्डक्ट हा पुरस्कार कु.अक्षद राठोड (इ.10वी,ब) या विद्यार्थ्यास देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते ऋषिकेश कराळे यांनी स्वअनुभवातून यशासाठी खडतर प्रवास करावा लागतो तेव्हा यशाची चव चाखता येते असे प्रोत्साहन पर वक्तव्य केले. कुलस्वामिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या सौ .सारिकाताई शेळके यांनी प्रत्येक सण समारंभ साजरे करून विद्यार्थ्यांना संस्कार देणाऱ्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला तसेच रो.शंकर हदीमनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या अध्यापनाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या मागे न धावता पालकांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा असे वक्तव्य केले.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि तळागाळातील सर्वच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे या हेतूने स्थापन केलेल्या शाळेमध्ये विद्यार्थी विविध स्पर्धेत विजयी होऊन शाळेचे नाव उज्ज्वल करतात याविषयी अभिमान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शालेय समिती अध्यक्षा. रजनीगंधा खांडगे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आभासी जगापेक्षा कलेच्या दुनियेतील आनंद घ्यावा असे मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सुंदर कलाकृती साकारणारे कलाशिक्षक .विजय जाधव, अमृता सुमन; सांस्कृतिक विभाग प्रमुख .आयेशा सय्यद, प्रतिभा शिरसाट; तसेच कोरिओग्राफर नावेद शेख,एडीसी टीम, उत्कृष्ट वाद्य व रंगमंचाची सजावट करणारे एस.एस.के डेकोरेटर्स श्री.सुमित कार्ले या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख,पर्यवेक्षिका.रेणू शर्मा,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका शाहीन शेख,सौ.वैभवी शिंदे, प्रज्ञा अहिरे,  तेजस्विनी सरोदे, सुजाता गुंजाळ, विजयमाला गायकवाड यांनी तसेच इयत्ता नववी व दहावीतील कु.पूर्वा बवले,कु.सुरक्षा कटरे,कु. मानसी मराठे,कु.समृद्धी भिकोले,कु.नेहा साळुंखे या विद्यार्थिनींनी केले. पर्यवेक्षिका.रेणू शर्मा,शालेय शिक्षिका .तेजस्विनी सरोदे,सौ.धनश्री पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!