अध्यात्मिकमहाराष्ट्रमावळ

उच्च न्यायालयाने दि. १९ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेल्या ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा असा निकाल देण्यात आला.

Spread the love

उच्च न्यायालयाने दि. १९ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेल्या ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा असा निकाल देण्यात आला. त्यामुळे श्रीएकविरा देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्थांचे ताब्यात देवस्थानचा कारभार.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,३ जानेवारी.

उच्च न्यायालयाने दि. 19/12/2023 रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेल्या ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा असा निकाल देण्यात आला. त्या मुळे त्या आदेशाची आंमलबजावणी करण्यात येवून श्रीएकविरा देवस्थानचा कारभार नवीन विश्वस्थांचे हातात सुफूर्त करण्यात आला.

या आदेशाने वेहेरगावच्या श्रीएकविरा गडावर आनंदाचे वातावरण असून जय एकविरा असा भाविकांकडून व नवनिर्वाचित विश्वस्थांचे कडून आई श्री एकविरा देवीचा जयघोष करण्यात आला.

उच्च न्यायालयाच्या ता. ४/०९/२०१८ रोजीच्या निकालानुसार ता.५ /०९/२०१८ पासुन आज पर्यत एकविरा देवस्थान ट्रस्ट चा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे होता. त्यामुळे नवनिर्वाचित विश्वस्त श्री नवनाथ रामचंद्र देशमुख यांनी सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने मुंबई हायकोर्ट येथे रिट याचिका नंबर 5243/2018 व अँप्लिकेशन नंबर 12906/2023 दाखल केली होती. म्हणून उच्च न्यायालयाने दि. १९/१२/२०२३ रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेल्या ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा असा निकाल देण्यात आला. त्याद्वारे आज दि. २९/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव येथे त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती म्हणजेच अध्यक्षा श्रीमती सी.आर. उमरेडकर मॅडम, सचिव तहसीलदार विक्रम देशमुख साहेब व चार्टी कमिशनर आर. परदेशी साहेब, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ म्हणजेच मारुती रामचंद्र देशमुख, संजय बाळकृष्ण गोविलकर, नवनाथ रामचंद्र देशमुख, सागर मोहन देवकर, विकास काशिनाथ पडवळ व महेंद्र अशोक देशमुख व मुंबई हायकोर्ट चे अधिकारी सुहास परांजपे साहेब अशी संयुक्त मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चा ताबा मुंबई हायकोर्ट चे अधिकारी सुहास परांजपे साहेब यांच्या समवेत नवनिर्वाचित विश्वस्तांकडे ताबा सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर प्रशासकीय समिती, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ व परांजपे साहेब हे सर्व आई एकविरा गडावर दर्शनास व राहिलेला ताबा घेण्यासाठी गेले व त्या ठिकाणी राहिलेल्या ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आला.

या निर्णयामुळे सर्व भाविकांकडून व विश्वस्थांचे वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!